बीसीसीआयने पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघात जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.
या दौऱ्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका ५ जानेवारी पासून सुरु होणार आहे. या आधी भारतीय संघ एक सराव सामना खेळणार आहे.
लंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी संघात नसलेल्या पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघात कमबॅक केले आहे. तर विजय शंकर आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले आहे.
भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय,के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमान सहा(यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.
भारतीय पुरुष संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
३० ते ३१डिसेंबर – सराव सामना
५ ते ९ जानेवारी – पहिली कसोटी, केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी – दुसरी कसोटी, सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी – तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग