---Advertisement---

आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ; चेन्नई अव्वल क्रमांकावर, तर मुंबई…

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 5:13 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्याबरोबरच आयपीएल २०२१ हंगामाची सांगता होईल.

या हंगामात आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. दरम्यान, यंदाच्या हंगामात आयपीएलला नवा विजेता मिळणार नाही हे निश्चित झाले आहे. कारण चेन्नई आणि कोलकाता या दोन्ही संघांनी यापूर्वी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच चेन्नई तब्बल नवव्यांदा अंतिम सामना खेळणार आहे, तर कोलकाता तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. चेन्नईने सर्वाधिक अंतिम सामने गाठण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. दुसर्‍या क्रमांकावर मुंबईचे नाव आहे.

या संघांनी जिंकलेय आयपीएलची विजेतीपदं
आयपीएलचा हा १४ वा हंगाम आहे. आतापर्यंत ६ संघांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यापैकी डेक्कन चार्जर्सचा संघ आता या स्पर्धेचा भाग नाही. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा, तर चेन्नईने तीन वेळा विजय मिळविला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा हा किताब जिंकण्याचे पराक्रम केले आहेत.

राजस्थान रॉयल्स संघ हा विजेतेपद मिळविणारा पहिला संघ ठरला. परंतु त्यानंतर त्यांचा संघ कधीही ट्रॉफी जिंकू शकला नाही, तर सनरायझर्स हैदराबादनेही एकदा विजेतेपद मिळवले आहे.

चेन्नईने खेळले सर्वाधिक अंतिम सामने
आयपीएलचे सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. चेन्नईने २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१८, २०१९ आणि २०२१ साली आयपीएलच्या अंतिम सामन्यांत प्रवेश केला आहे. यातील २०१०, २०११ आणि २०१८ साली चेन्नईला विजेतेपद मिळवण्यात यश आले आहे. तर, २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ साली चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

तसेच चेन्नईने २००९, २०१४, २०१६, २०१७ आणि २०२० मधील अंतिम सामने सोडले, तर स्पर्धेतील सर्व अंतिम सामने चेन्नईने खेळले आहेत. २००९, २०१४ आणि २०२० मध्ये ते प्ले ऑफमध्ये पोहचूनही अंतिम सामन्यात पोहोचू शकले नव्हते. २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नईच्या संघाला निलंबित करण्यात आले होते.

सर्वाधिक अंतिम सामना खेळणारा मुंबई दुसरा संघ
चेन्नईनंतर मुंबईचे नाव सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत येते. यावर्षी सहाव्यांदा संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१०, २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबईने अंतिम सामना खेळला. २०१० मध्ये मुंबईचा संघ पराभूत झाला होता, तर प्रत्येक वेळी जेतेपद जिंकण्यात मुंबईला यश आले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्सनेही यंदा तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने दोनदा खेळला आहे. याखेरीज पंजाब किंगस, राजस्थान रॉयल्स आणि आता दिल्ली कॅपिटल्स संघाने एका वेळेस अंतिम सामन्यात धडक दिली आहे. डेक्कन चार्जर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांनीही एक-एक अंतिम सामने खेळले आहेत. परंतु आता हे संघ स्पर्धेचा भाग नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या – 

मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ ३९२ विकेट्स घेणारा क्रिकेटर, ब्रेन ट्यूमरमुळे आयसीयूमध्ये दाखल

खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलेला दिसला विराट; नेटकरी म्हणे, ‘भारत असाच टी२० विश्वचषक जिंकेल’

नेहमी धोनीला कोसणाऱ्या गंभीरचे बदलले सूर, आयपीएल फायनलपूर्वी उधळली स्तुतीसुमने; पाहा काय म्हणाला?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---