जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) खेळवण्यात आला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात हैदराबादने मुंबईला १० विकेट्सने पराभूत करत प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री केली. या सामन्यात पराभव झाला असला, तरी मुंबईने आपले गुण आणि रनरेटमुळे आधीच प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले होते. यासह मुंबई संघाने एक खास कारनामा केला आहे.
आयपीएल २०२० हंगामाची सुरुवात पराभवाने करणाऱ्या मुंबईने धडाकेबाज प्रदर्शन करत पुनरागमन केले. त्यांनी या हंगामात १४ सामने खेळत ९ सामन्यात विजय मिळवला, तर उर्वरित ५ सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यासह आयपीएल २०२०मध्ये मुंबई संघ प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा पहिला संघ ठरला. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबईने हा कारनामा ९ वेळा केला आहे. मुंबई या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
मुंबईला पराभवाचं पाणी पाजत हैदराबाद संघानेही प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ६ वेळा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा कारनामा केला आहे.
यापूर्वी सोमवारी (२ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला होता. यामध्ये सामना पराभूत होऊनही बेंगलोरने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे बेंगलोरही आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये सर्वाधिक ६ वेळा एन्ट्री करणारा संघ ठरला.
हैदराबाद, बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (६) या यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सोबतच दिल्ली कॅपिटल्सनेही प्ले ऑफमध्ये एन्ट्री केली. दिल्लीने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा असा कारनामा आपल्या नावावर केला. ते या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
या यादीत अव्वलस्थानी चेन्नई सुपर किंग्ज आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक १० वेळा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा कारनामा केला आहे. याव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स (४), तर किंग्ज इलेव्हन पंजाब (२) वेळा प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत.
आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचणारे संघ
१० वेळा- चेन्नई सुपर किंग्ज
९* वेळा- मुंबई इंडियन्स
६* वेळा- सनरायझर्स हैदराबाद
६* वेळा- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
६ वेळा- कोलकाता नाईट रायडर्स
५* वेळा- दिल्ली कॅपिटल्स
४ वेळा- राजस्थान रॉयल्स
२ वेळा- किंग्ज इलेव्हन पंजाब
महत्त्वाच्या बातम्या-
-‘चिटिंग करता है तू…’ कोलकाता प्लेऑफमधून आऊट झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
-SRH VS MI: चुरसीच्या सामन्यात वॉर्नरची मोठ्या विक्रमाला गवसणी, लागोपाठ सहाव्यांदा केला पराक्रम
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?