---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट पुन्हा बदनाम! प्रमुख खेळाडूवर अल्पवयीन मुलीने लावले लैंगिक शोषणाचे आरोप

On: मंगळवार, डिसेंबर 21, 2021 4:02 PM
yasir-shah
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या अप्रतिम कामगिरी करत आहे. टी२० विश्वचषकानंतर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघाला त्यांनी टी२० मालिकेत एक तर्फी पराभूत केले. मात्र, आता संघाचा एक अनुभवी खेळाडू एका गंभीर प्रकरणात अडकला आहे. पाकिस्तान कसोटी संघाचा प्रमुख लेगस्पिनर यासिर शाह (Yasir Shah) याच्यावर एका अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यासिरसह त्याचा मित्र फरहान याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. (Yasir Shah Rape Case)

काय आहे प्रकरण
इस्लामाबाद येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत लिहिले आहे की, ‘यासिर शाह याचा मित्र फरहान याने बंदुकीचा धाक दाखवत माझे लैंगिक शोषण केले. तसेच या प्रकाराचे चित्रीकरण देखील त्याच्याकडून करण्यात आले. याबद्दल मी व्हाट्स ऍपद्वारे यासिरकडे तक्रार केली असता त्याने माझी खिल्ली उडवली. तसेच, मला लाज वाटेल असे वक्तव्ये केली. मी खूप प्रभावशाली व्यक्ती आहे, मी मोठ्या अधिकाऱ्यांना ओळखतो. अशी धमकी दिली. यासिर आणि फरहान अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करून त्यांचे व्हिडिओ बनवतात. त्याने मला वचन दिले होते की तो मला एक फ्लॅट, एक कार खरेदी करुन देईल. तसेच, पुढील 18 वर्षे माझा खर्च उचलेल.’

पोलिसांनी केली तक्रारीची पुष्टी
इस्लामाबाद पोलिसांनी यासिरविरुद्धच्या तक्रारीला दुजोरा दिला आहे. पीडित अल्पवयीन मुलीची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाईल, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. यासिर फोनवर तोंड बंद ठेवण्याची धमकी देत ​​असे आणि मित्र फरहानशी लग्न करण्यासही सांगत असे, असे मुलीने निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तान संघाच्या कर्णधारावरही झालेले आरोप
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. एका महिलेने बाबरवर १० वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता आणि तिला धमकीही दिली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, बाबरने तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते आणि ती गरोदरही होती. यानंतर बाबरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, बाबर आणि ती एकाच शाळेत शिकलेल व दोघेही एकाच वस्तीत राहत होते. (Babar Azam Rape Allegations)

महत्त्वाच्या बातम्या-

किती ते दुर्दैव! इंग्लंडला वाचवण्यासाठी २०० पेक्षा जास्त चेंडू खेळूनही बटलर झाला ‘हिट विकेट’, पाहा व्हिडिओ

सानिया-शोएबच्या भाच्याची कमाल! अवघ्या १९ व्या वर्षी त्रिशतकवीर बनत केला ‘हा’ विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---