बर्मिंघम। कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२२मध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसून येत आहे. ऍथलेटिक्स संघातील तेजस्विन शंकरने बुधवारी (३ ऑगस्ट) पुरूषांच्या उंच उडीत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने अंतिम क्षणात कांस्य पदक पटकावले आहे. तसेच कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात उंच उडीमध्ये पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
तेजस्विन शंकर याने (Tejaswin Shankar in Long Jump) या स्पर्धेत २.२२ मीटर अतंर पार परत काउंटबॅकमध्ये तिसरे स्थान पटकावले. त्याने एकाच प्रयत्नात ही कामगिरी केली आहे. तसेच त्याने दोन प्रयत्न करून सुद्धा २.२५ मीटरपेक्षा उंच उडी मारली नाही. रौप्य पदक जिंकण्यासाठी त्याने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात २.२८ मीटरची उडी मारली, मात्र त्यात तो अपयशी ठरला. यावेळी न्यूझीलंडच्या हाशिमने सुवर्ण आणि ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन स्टार्कने रौप्य पदक जिंकले. दोघांनीही २.२५ मीटरची उंच उडी मारली.
शंकरने हे कांस्य पदक बहामासच्या डोनाल्ड थॉमस आणि इंग्लंडच्या जोईल क्लार्क खान यांना मागे टाकत जिंकले. या दोघांनीही २.२२ मीटरची उडी मारली होती. तर शंकरने पहिल्याच प्रयत्नात ही कामगिरी केली. यामुळे तो या पदकाचा मानकरी ठरला.
शंकरच्या आधी कॉमनवेल्थ गेम्समध्ये भीम सिंग यांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यांनी एडनबर्गमध्ये झालेल्या स्पर्धेत २.०६ मीटरची उंच उडी मारली होती.
𝑻𝑱 𝒅𝒐𝒆𝒔 𝒊𝒕 𝒊𝒏 𝒔𝒕𝒚𝒍𝒆! 🙌@TejaswinShankar wins #TeamIndia’s first athletics medal at @birminghamcg22 with bronze in the men's high jump 🥉🇮🇳#B2022 | #EkIndiaTeamIndia | 📸 @ghosh_annesha pic.twitter.com/Bvo4hRCKjM
— Team India (@WeAreTeamIndia) August 3, 2022
शंकरने २०१८च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत २.२४मीटरची सर्वोच्च उडी मारत सहावे स्थान मिळवले होते. त्याचा हंगामातील सर्वोच्च विक्रम २.२७ मीटर आणि वैयक्तिक विक्रम २.२९ मीटर आहे.
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांच्याकडून शंकरला योग्य मानांकन न मिळाली नव्हती. यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जवळपास एक महिन्याच्या न्यायालयीन लढाईनंतर त्याला कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळण्याची परवाणगी मिळाली. त्याला २२ जुलैमध्ये खेळण्याची संमती देण्यात आल्यानंतर भारतीय ऑलिम्पिकच्या म्हणण्यानुसार आयोजकांनी त्याच्या प्रवेशाला मान्यता दिली.
भारताचे या स्पर्धेत एकूण १८ पदके झाली आहेत. त्यामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. याबरोबरच भारत पदक तालिकेत ७व्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG 2022: टीम इंडियाची उपांत्य फेरीत धमाकेदार एंट्री! जेमिमाह, रेणुकाने केली विशेष कामगिरी
मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिल्यामुळे ९ वर्षांनी घरी गेला ‘हा’ खेळाडू, वाचा कारण