fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब

तेंलगणामध्ये शुक्रवारी (7 डिसेंबर) झालेल्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या यादीत बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाचे नाव नसल्याने तिने याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच तेंलगणामध्ये पहिल्यांदाच विधानसभेचे मतदान झाले आहे.

“मी ऑनलाईन मतदाराची यादी तपासली असता त्यात मला माझे नाव गायब असल्याचे लक्षात आले”, असे ट्विट ज्वालाने केले.

“हे मतदान कसे काय बरोबर असू शकते जेव्हा मतदाराच्या यादीतूनच नावे गायब होत आहेत”, असे ट्विट करत तिने प्रश्न विचारला आहे.

हे ट्विट्स केल्यावर ती मतदान करण्यासाठी ज्वाला गेली असता तिला ही गोष्ट लक्षात आली. यावेळी तिने तिच्या बाबांचे आणि बहिणीचे नावही गायब असून फक्त तिच्या आईलाच मतदान करता आले, असे एका व्हिडिओच्या आधारे तिने सांगितले. हा व्हिडिओ ज्वालाने ट्विटही केला आहे.

ज्वालाने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी

किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम

Video: मैदानावर सोडा विलियमसनने पाकिस्तानला मैदानाबाहेरही धूतले

You might also like