टीम इंडियाने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2025 चा किताब जिंकला. जेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. भारताच्या विजयात गोंगाडी त्रिशाने महत्त्वाची भूमिका बजावली. आता त्रिशावर पैशांचा पाऊस पडत आहे. तेलंगणा सरकारने तिच्यासाठी तिजोरी उघडली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्रिशाला 1 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री ऑफिसने सोशल मीडियावर त्रिशासाठी एक पोस्टही शेअर केली आहे. मुख्यमंत्र्यानी अलीकडेच त्रिशाची भेट घेतली.
अंतिम सामन्यासाठी त्रिशाला ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले. यासोबतच तिला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणूनही निवडण्यात आले. बुधवारी त्रिशाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. ती हैदराबादमधील ज्युबिली हिल्सवर पोहोचली होती. तेलंगणा सरकारने त्रिशाला बक्षीस म्हणून 1 कोटी रुपये दिले आहेत. त्रिशाच्या कुटुंबानेही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेलंगणा सरकारने टीम इंडियाची खेळाडू धृती केसरीलाही 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.
अशी राहिली गोंगाडी त्रिशाची कामगिरी…
यंदाच्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकात त्रिशाने धमाकेदार कामगिरी केली. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत ती अव्वल स्थानावर होती. त्रिशाने 7 सामन्यांमध्ये एकूण 309 धावा केल्या होत्या. या दरम्यान तिने 45 चौकार आणि 5 षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्रिशाने 33 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. यासोबतच 3 विकेट्सही घेतल्या. डावात तिने 4 षटके टाकली. या दरम्यान तिने फक्त 15 धावा दिल्या. या अष्टपैलू कामगिरीसाठी तिची मालिकावीर तसेच सामनावीर म्हणूनही निवड करण्यात आली.
అండర్ -19 మహిళల T20 ప్రపంచ కప్లో ‘ప్లేయర్ ఆఫ్ ది టోర్నమెంట్’గా నిలిచి టీమ్ ఇండియా విజయంలో కీలకపాత్ర పోషించిన గొంగడి త్రిష గారికి ప్రోత్సాహకంగా ముఖ్యమంత్రి @revanth_anumula గారు కోటి రూపాయలు నజరానా ప్రకటించారు. మలేషియాలో జరిగిన మహిళ అండర్ -19 ప్రపంచ కప్లో అద్భుతంగా రాణించిన… pic.twitter.com/0lXZyJpMMg
— Telangana CMO (@TelanganaCMO) February 5, 2025
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने केली पंचांची यादी जाहीर..! भारतीय पंच यादीतून गायब
IND vs ENG; नागपूर वनडेसाठी संघाची घोषणा, 15 महिन्यानंतर या खेळाडूचे पुनरागमन
IND vs ENG: पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, हा खेळाडू ‘एक्स’फॅक्टर






