---Advertisement---

भुवीच्या बाऊंसरनंतर आफ्रिकेचा कर्णधार गारद, रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला

Temba-Bavuma
---Advertisement---

भारत विरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिका समोर विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य होते. दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या स्फोटक खेळीमुळे भारतीय संघ कठीण परिस्थितीतून बाहेर पडला आणि १६९ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजी करणे कठीण असलेल्या खेळपट्टीवर क्विंटन डी कॉकसह संघाचा कर्णधार टेंबा बावुमा यांच्यावर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी होती, परंतु चौथ्या षटकात दुखापतग्रस्त होऊन तो परतला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने लवकरच आपले शस्त्र टाकले आणि भारताने या निर्णायक सामन्यात ८२ धावांनी विजय मिळवला. 

भुवीने चेंडू मारला
तिसऱ्या षटकात टेंबा बावुमाला भुवनेश्वर कुमारने एक धमाकेदार बाऊंसर फेकला. भुवीचा टाकलेला चेंडू बवुमा समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या छातीवर आदळला, त्यानंतर तो हेल्मेटच्या लोखंडी जाळीवर आदळला. त्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला. टीम फिजिओने मैदानावर येऊन त्याची तपासणी केली. काही वेळाने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पुन्हा फलंदाजी करण्यास तयार झाला.

डायव्हिंगमध्ये जखमी
तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बावुमाने मिडऑनच्या दिशेने शॉट खेळला आणि धाव घेतली. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या हार्दिक पंड्याने पटकन चेंडू उचलून विकेटच्या दिशेने फेकला. बावुमाने धावबाद होण्यापासून वाचवण्यासाठी डायव्ह मारली. पण विकेटवर आला, तो नाबाद राहिला पण त्याच्या कोपराला दुखापत झाली. बावुमाने पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूचा बचाव केला पण वेदनांपासून स्वत:चा बचाव करण्यास असफल ठरला.

https://twitter.com/SoniGup46462554/status/1537822271217119232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1537822271217119232%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Ftemba-bavuma-walks-off-retired-hurt-after-he-injured-his-elbow%2Farticleshow%2F92287083.cms

परतण्याचा निर्णय घेतला
दक्षिण आफ्रिकेचा फिजिओ पुन्हा एकदा मैदानावर आला. त्याने बावुमाच्या डाव्या कोपरावर स्पे लावला, पण त्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे टेंबा बावुमाने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने नवा फलंदाज ड्वेन प्रिटोरियसला फलंदाजीसाठी पाठवले.

दरम्यान, या सामन्यात बवुमा परतल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जास्त चमक दाखवता आली नाही. बवुमानंतर लगेचच डिकॉक धावबाद होत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात दबाव निर्माण केला. आणि सामना खिशात घातला. या मालिकेतील पाचवा सामना रविवारी (१९ जून) बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

वेंकटेश प्रसादशी पंगा घेणे ट्विटर युजरला पडले महागात, नुपूर शर्मावरील प्रश्नाला दिले सडेतोड प्रत्युत्तर

अवघ्या १७ धावांवर पडलेल्या ५ विकेट्स, मग कपिल पाजींनी खिंड लढवत ठोकल्या होत्या नाबाद १७५ धावा

बीसीसीआयनंतर आता आयसीसीही होणार मालामाल, मीडिया हक्कांच्या लिलावातून करणार भरमसाठ कमाई

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---