---Advertisement---

227 दिवसांनी अनुभवी फलंदाज मैदानात; पहिल्याच सामन्यात मोठी खेळी, टी20 संघात मिळणार का स्थान?

On: रविवार, ऑगस्ट 11, 2024 2:54 PM
Temba-Bavuma
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (west indies vs south africa) यांच्यातील पहिला कसोटी सामना त्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यास मैदानात उतरला आहे. अफ्रिकन फलंदाजांनी पहिल्या डावात शानदार फलंदाजी केले. ज्यामध्ये संघाचा कर्णधार टेंबा बवुमा बऱ्याच दिवसांनी मैदानात खेळताना दिसला. तो तब्बल 227 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यासठी मैदानात उतरला आणि त्याने पहिल्या सामन्यातच यजमान संघांविरुद्ध शानदार मोठी खेळी खेळली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात टेंबा बावुमा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याचे शतक हुकले पण त्याने संघासाठी 86 धावांची मोठी खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने 182 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचा स्ट्राइक रेट 47.25 होता. बवुमा व्यतिरिक्त, टोनी डीजॉर्जने देखील धावांची सलामी दिली आणि 78 धावांची खेळी खेळली. टोनीने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात एकूण 344 धावा केल्या.

काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला होता. एकदिवसीय विश्वचषकात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टेंबा बावुमाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आले. त्यावेळी या स्पर्धेत संघाचे नेतृत्व एडन मार्करामकडे होते. बावुमाने डिसेंबर 2023 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. पहिल्याच कसोटीत तो जखमी झाला. आता बऱ्याच दिवसांनी तो वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत आहे.

टेंबा बवुमाच्या अंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 57 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 97 डावात  2997 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय 38  सामन्यात 1512 धावा केल्या असून 5 शतकांचा समावेश आहे. टी20 सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास 36 सामन्यात 670 धावा केल्या आहेत.

हेही वाचा-

सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणखी एका महिला बॉक्सरवर पुरुष असल्याचा आरोप, जागतिक स्पर्धेत घातली होती बंदी
मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरी, कारण जाणून तुम्ही पण व्हाल थक्कं!
नरेंद्र मोदी स्टेडियमचा मान जाणार! भारतात या ठिकाणी बनणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---