---Advertisement---

“दुसऱ्या डावात मैदान लहान झालं असेल,” तेवतियाच्या खेळीनंतर सचिनने ‘या’ समालोचकाला केले ट्रोल

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 12:38 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने एका षटकात 5 षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे लक्ष राजस्थानने तीन चेंडू शिल्लक ठेवून गाठले.

त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिकेटमधील महान खेळाडूंनी व समालोचकांनीही त्याचे कौतुक केले आहे. समालोचक हर्षा भोगले याने तेवतियाच्या खेळीबद्दल एक ट्विट केले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्विटला प्रत्युत्तर देत ट्रोल केले आहे.

खरं तर हर्षाने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “संघ पराभवाच्या अगदी जवळ होता. तेवतियाने सामन्याचे चित्र बदलले हे पाहून आनंद झाला.”

त्यावर सचिन तेंडुलकरने उत्तर दिले. त्याने लिहिले, “राहुल तेवतियाने उत्कृष्ट कामगिरी केली. राजस्थान रॉयल्स संघ तीन चेंडू शिल्लक ठेवून 224 धावांचे लक्ष्य गाठेल असे कुणाला वाटले असेल? हर्षा, कदाचित दुसर्‍या डावात मैदान लहान झाले असेल.”

राजस्थान संघाला शेवटच्या तीन षटकांत 51 धावांची गरज होती. युवा फलंदाज संजू सॅमसन (42 चेंडूत 85 धावा, 4 चौकार,7 षटकार) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (27 चेंडूत 50 धावा,7 चौकार, 2 षटकार) यांनीही उत्तम फलंदाजी केली. या शानदार खेळीसाठी संजू सॅमसनला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---