१५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेतून इंग्लंडचा लोकल बॉय अॅन्डी मरेने माघार घेण्याची घोषणा शनिवार,३० जूनला केली.
गेल्या एकवर्षांपासून हिप इंज्यूरीमुळे त्रस्त असलेल्या मरेने २०१८च्या विंम्बलडनमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून कसून सराव करत होता. तसेच गेल्या महिन्यात तो क्विन्स क्लब स्पर्धेतही सहभागी झाला होता.
मात्र त्याने शनिवार,३० जूनला झालेल्या पत्रकार परीषदेत त्याच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांबरोबर चर्चा केल्यानंतर स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
“मला हे सांगताना वाईट वाटते की, मी अजूनही पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याने विंम्बलडनमधून माघार घेतोय. गेल्या दहा दिवसात मी सरावात चांगली प्रगती केली आहे. मात्र विंम्बलडनमध्ये बेस्ट ऑफ फाईव सेट खेळताना मला त्रास होईल असे मत माझ्या संघव्यवस्थापनाने मांडले होते. त्यामुळे मी या स्पर्धेतून माघार घेतोय.” असे दोन वेळचा विंम्बलडन विजेता अॅन्डी मरे म्हणाला.
“मी उद्यापासून यूएस ओपनच्या दृष्टीने हार्ड कोर्टवर सरावाला सुरवात करत आहे. मला शुभेच्छा देणऱ्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.” असे पत्रकार परीषदेच्या शेवटी मरे म्हणाला.
२०१३ साली विंम्बलडन जिंकत अॅन्डी मरे ७७ वर्षानंतर विंम्बलडनचे विजेतेपद मिळवणारा पहिला इंग्लिश टेनिसपटूला ठरला होता.
अॅन्डी मरेने त्याच्या कारकिर्दित आत्तापर्यंत तीन ग्रॅन्डस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. त्यामध्ये दोन विंम्बलडन आणि एक यूएस ओपनच्या विजेतेपदांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली…








