---Advertisement---

ब्रेकिंग! दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस उतरला राजकारणाच्या मैदानात, तृणमूल काँग्रेस पक्षात केला प्रवेश

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 2:37 PM
---Advertisement---

क्रिकेटपटू असो वा इतर कोणत्या क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंनी राजकारणात उतरणे नवीन नाही. नवज्योत सिंग सिद्धूपासून ते गौतम गंभीरपर्यंत क्रिडापटूंची अशी बरीचशी उदाहरणे आहेत. याच यादीत आता भारताच्या दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याचे नाव जोडले गेले आहे. शुक्रवार रोजी (२९ ऑक्टोबर) लिएंडरने गोवा येथे तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

१८ वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या लिएंडरने त्रिणमूळ काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. पक्षाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.

https://twitter.com/AITCofficial/status/1453991434776834052?s=20

लिएंडरविषयी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “लिएंडर हा माझ्या लहाण्या भावासारखा आहे.” याबरोबरच जनतेला उद्देशून त्या म्हणाल्या की, “आम्हाला राज्यांचे मजबूत संघटन पाहायचे आहे. आम्हाला संघराज्य संरचना कायम ठेवायची आहे.”

https://twitter.com/BanglarGorboMB/status/1453993773415895040?s=20

ममता बॅनर्जींच्या पक्षासोबत जोडले गेल्यानंतर ४८ वर्षीय लिएंडर पेस म्हणाला की, “मी टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर आता मी देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करू इच्छितो आगे. दिदी (ममता बॅनर्जी) एक खऱ्या चँपियन आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीनं दिली ‘या’ खेळाडूची गॅरंटी, अन्यथा बीसीसीआय पाठवणार होती घरी! पण तोच बनलाय संघाची डोकेदुखी 

लाईव्ह पत्रकार परिषदेत वॉर्नर उचलणार होता मोठे पाऊल, पण मॅनेजमेंटने त्वरित अडवले; पाहा व्हिडिओ

वॉर्नर सोडणार सनरायझर्स हैदराबादची साथ, आता नव्या संघांच्या नेतृत्तवपदासाठी ठोकणार दावेदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---