---Advertisement---

धोनीनं दिली ‘या’ खेळाडूची गॅरंटी, अन्यथा बीसीसीआय पाठवणार होती घरी! पण तोच बनलाय संघाची डोकेदुखी 

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 2:03 PM
MS Dhoni, Rohit Sharma, Virat Kohli and Ravi Shastri
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम संपल्यानंतर लगेचच युएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार रंगला आहे. या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात हार्दिक पंड्या यालाही जागा देण्यात आली आहे. परंतु आयपीएलमधील त्याचे प्रदर्शन पाहता आणि त्याच्या दुखापतीमुळे त्याला इतर खेळाडूंसोबत मायदेशी पाठवण्याचा संघ निवडकर्त्यांचा विचार होता.

परंतु मेन्टॉर (मार्गदर्शक) म्हणून संघाशी जोडला गेलेला एमएस धोनी याच्यामुळे हार्दिकला अजून एक संधी दिली असल्याचा मोठा उलगडा झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय संघातील हालचालींविषयी माहिती ठेवणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, “आयपीएलमध्ये अष्टपैलू असूनही हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. याच कारणास्तव संघ निवडकर्ते त्याला स्वदेशी परत पाठवू इच्छित होते. परंतु एमएस धोनीने त्याच्या फिनिशिंग शैलीवर विश्वास दाखवला. त्याच्यातील या कौशल्यामुळे धोनीने संघ निवडकर्त्यांना हार्दिकला अजून एक संधी देण्यास तयार केले.”

परंतु हार्दिक धोनीचा हा विश्वास सार्थी लावण्यात अपयशी ठरताना दिसतो आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८ चेंडूंमध्ये २ चौकारांच्या मदतीने फक्त ११ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापतही झाली होती. त्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नव्हता.

फलंदाजाच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिल्यानंतर हार्दिककडून पाकिस्तानविरुद्ध फिनिशरची भूमिका बजावण्याची अपेक्षा होती. याच कारणामुळे त्याला अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या जागी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले होते. जरी हार्दिक या सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नसला तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० विश्वचषक सामन्यातही संघ त्याला पुन्हा आजमावून पाहू शकतो. पण जर हार्दिक न्यूझीलंडविरुद्धही फिनिशरची भूमिका निभावू शकला नाही. तर धोनीने त्याच्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होतील.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---