---Advertisement---

वॉर्नर सोडणार सनरायझर्स हैदराबादची साथ, आता नव्या संघांच्या नेतृत्तवपदासाठी ठोकणार दावेदारी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 11:57 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर आणि आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर याच्यासाठी आयपीएल २०२१ चा हंगाम अतिशय वाईट राहिला आहे. सुरुवातीला संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आणि केन विलियम्सनच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली. त्यानंतर त्याला खराब फलंदाजी फॉर्ममुळे प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर करण्यात आले. संघाने दिलेल्या या वागणूकीनंतर आता वॉर्नर येत्या आयपीएल २०२२ मध्ये दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. याबाबत स्वत: वॉर्नरनेच संकेत दिले आहेत.

हैदराबाद संघ आपल्याला रिटेन करण्याची शक्यता कमी असल्याने आपण आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात उतरणार असल्याचे वॉर्नरने सांगितले आहे.

‘एसईएन रेडियो’शी बोलताना वॉर्नर म्हणाला की, “मी लिलावाच्या प्रक्रियेत माझे नाव देणार आहे. सध्या आयपीएलकडून मिळालेल्या संकेतानुसार मला सनरायझर्स संघात पुन्हा कायम केले जाणार नाही. त्यामुळे मी एका नव्या सुरुवातीची अपेक्षा करतो आहे. मला त्यांच्याकडून जो सबब दिला गेला तो ऐकून मला खूप हसू येत होते. अन्य २ खेळाडू माझ्यापेक्षा चांगली फलंदाजी करत असल्याने माझ्याबाबत हा निर्णय घेतला गेल्याचे मला सांगण्यात आले होते.”

महत्त्वाची बाब म्हणजे, याच वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादचा संघ पहिल्यांदा आयपीएलचा विजेता बनला होता. २०१६ मध्ये त्याने संघाला पहिलावहिला आयपीएल चषक जिंकून दिला होता. तेव्हापासून २०२१ च्या सुरुवातीपर्यंत तो या संघाचा कर्णधार राहिला आहे. केवळ नेतृत्त्वात नव्हे तर फलंदाजीतही त्याने आपली छाप सोडली आहे.

आयपीएलमध्ये वॉर्नरने १५० सामने खेळताना ५४४९ धावा केल्या आहेत. २०१६ साली तर त्याने १७ सामन्यांमध्ये ८४८ धावा चोपल्या होत्या. त्यापुढील सलग ३ हंगामातही त्याने ५०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या होत्या. अशात जर वॉर्नर आगामी मेगा लिलावात उतरल्यास त्याची नव्या अहमदाबाद किंवा लखनऊ संघाच्या कर्णधारपदीही नियुक्ती होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच शमीने शेअर केली पोस्ट, वाचा काय लिहिलंय त्यात?

टी२० विश्वचषकाच्या रणधुमाळीत ‘या’ स्टार वेगवान गोलंदाजाने सोडला भारतीय संघ, परतला मायदेशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---