टेनिसविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल याने मोठी घोषणा केली आहे. 28 मेपासून सुरू होत असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये भाग घेणार नसल्याचे नदालने सांगितले आहे. नदाल शरीराच्या पार्श्वभागात झालेल्या दुखापतीने ग्रस्त आहे. यावरून तब्बल 14 फ्रेंच ओपन किताब जिंकणाऱ्या नदालने असे संकेत दिले आहेत की, 2024 हे त्याचे व्यावसायिक टेनिसचे शेवटचे वर्ष असू शकते.
रोलँड गॅरोसमध्ये खेळणे अशक्य
राफेल नदाल (Rafael Nadal) हा 18 जानेवारीपासून टेनिसपासून दूर आहे. 22 वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नदालने माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाहीये. दिग्गज टेनिसपटू या महिन्याच्या सुरुवातीला मोंटे-कार्लो मास्टर्स आणि माद्रिद तसेच रोम येथे होणाऱ्या क्ले स्पर्धेतून बाहेर पडला होता. तो म्हणाला की, “दुखापत बरी झाली नाहीये. मी खेळपट्टीवर पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, पण माझ्यासाठी रोलँड गॅरोस (फ्रेंच ओपन) स्पर्धेत खेळणे अश्यक्य आहे. हे कठीण आहे, पण माझ्या शरीराने निर्णय घेतला आहे. मी पुढील काही महिने खेळणार नाही. कारण, मागील काही महिन्यातील परिणाम हे खालच्या स्तराचे आहेत.”
कोरोनानंतर टेनिसचा आनंद घेऊ शकला नाही
पुढे बोलताना नदाल म्हणाला की, जरी त्याने अलीकडील काही वर्षांमध्ये यश मिळवले असेल, पण कोरोनानंतर टेनिसचा आनंद घेऊ शकला नाही. त्याने 2024 हंगामातील सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये खेळण्याची इच्छाही व्यक्त केली, ज्यामध्ये जोर देऊन म्हटले की, पुढील वर्षी त्याला त्याची कारकीर्द संपवायची आहे.
व्यावसायिक दौऱ्यावर कदाचित 2024 अखेरचे वर्ष
नदाल म्हणाला की, “मला सातत्याने खेळायचे आहे, पण मला दुखापत झाली आहे. त्यामुळे खूपच समस्या झाली. मागील काही महिन्यात मी पुनरागमनासाठी मेहनत घेतली आहे. आता बरे होण्यासाठी वेळ घ्यायचा आहे. मी पुनरागमनाची तारीख देणार नाही. जेव्हा मी मानसिक आणि शारीरिकरीत्या तयार होईल, तेव्हा पुनरागमन करेल. डेविस कपमध्ये पुनरागमन करणे आणि 2024ची चांगली सुरुवात करणे होऊ शकते, पण व्यावसायिक दौऱ्यावर कदाचित 2024 हे माझे अखेरचे वर्ष असेल. माझे काम प्रयत्न करणे आणि आनंद घेणे आहे. तसेच, त्या सर्व स्पर्धांना निरोप देणे, जे माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत.”
सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी किताब फ्रेंच ओपनमध्ये
विशेष म्हणजे, राफेल नदाल याने जिंकलेल्या सर्वाधिक 22 ग्रँड स्लॅम किताबांमधील 14 किताब हे एकट्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून आले आहेत. त्यामुळे 28 मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून नदाल बाहेर पडल्यामुळे चाहतेही निराश झाले आहेत. (tennis player rafael nadal will not play in french open signs of retirement next year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा रंगणार ‘अल्टीमेट टेबल टेनिस’ स्पर्धेचा थरार; १३ जुलै पासून पुण्यातील बालेवाडी संकुलनात होणार सामने
ATP Rankings: 18 वर्षात पहिल्यांदाच राफेल नदाल टॉप-10मधून बाहेर, धक्कादायक कारण आलं समोर