---Advertisement---

Video- या कारणामुळे फेडररला जगात चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळते

On: बुधवार, जुलै 4, 2018 4:33 PM
---Advertisement---

सोमवार, 2 जुलैला विंम्बडनच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात गतविजेता रॉजर फेडररने  सामन्याबरोबरच त्याच्या एका कृतीने करोडो चाहत्यांची मने जिंकली.

सर्बियाच्या दुसान लोजोविकवर फेडररने  6-1, 6-3, 6-4 असा विजय मिळवला.

या विजयानंतर मैदानावरील चाहत्यांना स्वाक्षरी देताना एका भारतीय चाहतीने फेडररला एक फलक दाखवत त्याच्या हेअर बॅन्डची मागणी केली.

“रॉजर प्लिज मला तुझे हेअर बॅन्ड मिळेल का!!!” असा फलक त्या चाहतीच्या हातात होता.

आपल्या चाहतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फेडररने त्याच्या बॅगमधील एक हेअर बॅन्ड तीला दिला.

फेडररच्या या कृतीचा सर्व टेनिस प्रेमींना आनंद झालाच पण यावेळी त्या युवा चाहतीच्या चेहऱ्यावर आनंद मात्र मावत नव्हता.

यानंतर फेडररच्या चाहतीच्या वडीलांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला.

त्याचबरोबर फेडररच्या या कृतीचे अनेकांनी कौतूक केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-कुलदीप यादव काही ऐकेना! केला असा कारनामा की इंग्लंडचे फलंदाज फक्त पहात…

-भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment