---Advertisement---

कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात

On: मंगळवार, जुलै 28, 2020 5:29 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या विसडन चषक कसोटी मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यातील आजच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. ब्रॉडने आज कसोटी कारकिर्दीतील ५००वी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट त्याची ५००वी विकेट ठरला.

अशी कामगिरी करणारा तो जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला.

१३वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने १४०व्या कसोटीत हा टप्पा पार केला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांत तो जेम्स अँडरसननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

ब्रॉडपुर्वी ५००विकेट घेणारा शेवटचा गोलंदाज हा जेम्स अँडरसन हा होता. त्याने २०१७मध्ये हा कारनामा केला होता. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा ५०० विकेट्स घेण्याचा कारनामा हा कर्टनी वॉल्श यांनी २००१ साली केला होता. फिरकीपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने २००४मध्ये ५०० विकेट्सचा टप्पा पार केला होता.

भारताच्या अनिल कुंबळेने २००६मध्ये ५०० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तर कसोटीत ८०० विकेट्स घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरनने २००४मध्ये वॉर्नपाठोपाठ ५०० विकेट्स घेतल्या होत्या.

५०० विकेट्सचा टप्पा कुणी कधी पार केला-

२००१- कर्टनी वॉल्श

२००४- शेन वॉर्न

२००४- मुथय्या मुरलीधरन

२००५- ग्लेन मॅकग्रा

२००६- अनिल कुंबळे

२०१७- जेम्स अँंडरसन

२०२०- स्टुअर्ट ब्रॉड

 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---