---Advertisement---

‘त्या’ ऐतिहासिक कसोटीची ९० वर्षं; एकही अर्धशतक न लगावता अवघ्या दीड दिवसात संपला होता सामना

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 6:29 PM
---Advertisement---

क्रिकेट या खेळातील सर्वात कठीण फॉरमॅट म्हणजे कसोटी क्रिकेट होय. पाच दिवस चालणार्‍या या क्रिकेटमध्ये खेळाडूंची अग्निपरीक्षा असते. त्याचबरोबर या फॉरमॅट मध्ये खेळाडूंच्या सहनशक्तीचे आकलन होते. या खेळात प्रामुख्याने खेळाडूमध्ये सहनशक्ती असावी लागते. कारण हा फॉरमॅट मोठ्या स्वरूपाचा असतो. परंतु तुम्ही कधी दीड दिवसात कसोटी सामना संपला आहे असे कधी ऐकले आहे का? नसेल तर आज आम्ही या लेखामधून दीड दिवसात संपलेल्या ऐतिहासिक सामन्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

दीड दिवसात संपणार सामना आजच्या दिवशीच 1930 मध्ये झाला होता. हा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन देशा दरम्यान खेळला गेला होता. त्याचबरोबर या सामन्याचे ठिकाण क्राइस्टचर्च हे होते. हा सामना बर्‍याच कारणामुळे इतिहासात नोंदवला गेला आहे. त्यामुळे चला तर या ऐतिहासिक सामन्याबद्दल जाणून घेवू.

इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौर्‍यावर 1930 साली गेला होता. पहिला कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला गेला होता. या सामन्याच्या निकाल अवघ्या दोन दिवसाच्या आत लागला होता. हा सामना दीड दिवसात आटोपला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने अगदी सहज 8 विकेट्सने जिंकला होता. या दोन्ही संघातील एक ही खेळाडू अर्धशतक ठोकू शकला नव्हता. या सामन्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात मॉरिस एलमने या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. त्याने इंग्लंड संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते. या गोलंदाजाने 8 व्या षटकात गोलंदाजी करायला आल्यानंतर त्याने 5 चेंडूत 4 विकेट्स घेवून हॅट्ट्रिक सुद्धा नोंदवली. त्यामुळे या सामन्यात खळबळ माजली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची ऐतिहासिक सामन्यात नोंद झाली. यामुळे इंग्लंड संघाला या सामन्यात विजय प्राप्त करता आला .

एकाच देशाचे दोन संघ एकाच दिवशी खेळत होते दोन सामने

या ऐतिहासिक सामन्याबरोबरच एक अजून विशेष घटना घडली होती. या सामन्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच देशाचे दोन्ही संघ दोन वेगवेगळ्या संघासोबत खेळत होते. यापूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती. त्यांनंतर ही अजून घडली नाही. इंग्लंडचा एक संघ क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळत होता, तर दुसरा संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळत होता. दोन्ही संघ कसोटी सामनाच खेळत होते.

महत्वाच्या बातम्या:

म्हणून मोहम्मद आमिरला वगळले होते, प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने केला खुलासा

हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर

धक्कादायक! दहशतवाद्यांच्या बातमीसोबत छापला विराट-अनुष्काचा फोटो, सोशल मीडियावर कडाडून टीका; पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---