12 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ अजून घोषित झालेला नाही. त्यामुळे ज्यांना या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळणार नाही ते खेळाडू कसोटी मालिकेनंतर भारतात परतणार आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश असू शकतो.
रहाणे आणि पुजारा दोघेही कसोटी क्रिकेटसाठी ओळखले जातात. यामुळे हे दोघे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लंड ए विरुद्ध खेळू शकतात.
भारताचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामने संपल्यावर पुढील कसोटी सामना जुलैमध्ये होणार आहे. यामध्ये ते विंडीज विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहेत. हे सामने कसोटी 2019च्या चॅम्पियनशीपचे असणार आहेत.
भारतात परतल्यावर रहाणे आणि पुजारा हे रणजी ट्रॉफी खेळणार आहेत. तर ही स्पर्धा जानेवारीमध्ये संपणार आहे.
“इंग्लंड ए संघ चार दिवसाचे कसोटी, प्रथम श्रेणी आणि टी20 सामने खेळणार आहेत. त्यामुळे काही भारतीय वेगवान गोलंदाजांना आणि फलंदाजांना त्यांच्या विरुद्ध खेळण्याचा फायदा होणार आहे”, असे बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले.
यामुळे भारतीय संघनिवड अधिकारी रहाणे, पुजारा आणि पृथ्वी शॉचा इंडिया ए संघात समावेश करू शकतात.
मर्यादित षटकासाठी भारतीय संघात नसणारा पुजारा सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकतो. तर रहाणे मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी भारतीय संघाने केला कसून सराव
–क्यूरेटरकडून झालेल्या त्या चूकीमुळे सामन्याला झाला तब्बल अडीच तास उशीर
–हार्दिक पंड्याने काढलेला टीम इंडियाचा सर्वोत्तम सेल्फी पाहिला का ?