आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसी अध्यक्षांच्या मते देशांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या टी-२० लीगमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर द्विपक्षीय मालिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कसोटी क्रिकेटविषयी त्यांना वाटते की, पुढच्या एका दशकात देशांतर्गत लीगमुळे या प्रकारातील सामन्यांची संख्याही कमी होईल.
ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांची नोव्हेंबर २०२०मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली होती. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. यादरम्यान बार्कले एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, “प्रत्येक वर्षी महिला आणि पुरुष क्रिकेटची एक-एक स्पर्धा असते. त्याव्यतिरिक्त देशांतर्गत लीग वाढत चालल्या आहेत. त्यामुळे द्विपक्षीय मालिका लहान होत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दुर्दैवी परिणाम पाहायला मिळू शकतात.”
ते पुढे बोलताना म्हणाले की, “पुढच्या १० ते १५ वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट खेळाचा अभिन्न भाग तर राहील, पण सामन्यांची संख्या कमी होऊ शकते.” असे असले, तरी बार्कले यांनी असाही संकेत दिला की, भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासारख्या संघांवर मात्र या गोष्टींचा परिणाम होताना दिसणार नाही.
बार्कले यांना वाटते की, महिला क्रिकेटमध्ये कसोटी प्रकारात खूपच संथ गतीने विकास होत आहे. त्यांच्या मते, महिला क्रिकेटमध्ये कसोटी प्रकारात अधिक वेगाने विकास होताना दिसला पाहिजे. ते म्हणाले की, “कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत इंफ्रास्ट्रक्चर त्या प्रकारचे पाहिजे, जे सध्या कोणत्याच देशाकडे नाहीये. मला नाही वाटत की, महिला क्रिकेटमध्ये कसोटी प्रकारात तेवढ्या गतीने विकास होत आहे.”
दरम्यान, अलीकडच्या काळात आयपीएल आणि सीपीएलसारख्या फ्रँचायझी क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर चांगलाच परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा फ्रँचायझीला अधिक महत्व देताना दिसले आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटविषयी मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये द्विपक्षीय मालिकांची संख्या वाढली आहे, जी आता कमी झाली पाहिजे. शास्त्रींच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी
मुलींच्या हट्टासाठी गाण्यावर थिरकला डेविड वॉर्नर, पाहा व्हिडिओ
युझीचा ‘किल्लर’ लूक, टीम इंडियात पुनरागमन करण्याआधी चहलने केली नवी हेयरस्टाईल