अमेरिकेत प्रथमच खेळल्या गेलेल्या यूएस मास्टर्स टी10 लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (27 ऑगस्ट) खेळला गेला. अंतिम सामन्यात टेक्सास चार्जर्स विरुद्ध न्यूयॉर्क वॉरियर्स हे संघ समोरासमोर आले. निर्धारित 10 षटकांमध्ये सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये टेक्सासने विजेतेपद आपल्या नावे केले.
फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूयॉर्क संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, त्यांचा सलामीवीर कामरान अकमल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर त्यांचे इतर कोणतेही फलंदाज फारसा संघर्ष करू शकले नाहीत. एकट्या जोनाथन कार्टर याने नाबाद 39 धावांची खेळी केली. टेक्सास संघासाठी एहसान आदिलन सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टेक्सास संघाला कर्णधार मोहम्मद हाफिज याने केवळ 17 चेंडूत 46 धावा कुटत सामन्यात आघाडीवर नेले. मात्र त्यानंतर कर्णधार बेन डंक वगळता इतर कोणताही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. अखेरच्या षटकात न्यूयॉर्क संघासाठी शाहिद आफ्रिदी याने नऊ धावांचा बचाव करत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.
सुपर ओव्हरमध्ये बेन डंक व मुख्तार यांनी प्रत्येकी एक षटकार मारत 15 धावा उभ्या केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात न्यूयॉर्क संघ केवळ 13 धावा करू शकल्याने टेक्सासचा विजय झाला. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद हाफिज याला स्पर्धेचा मानकरी घोषित केले गेले.
(Texas Chargers Won US Masters T10 League Beat Newyork Warriors In Super Over Final)
महत्वाच्या बातम्या –
‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन
BREAKING: स्मृतीची सदर्न ब्रेव्हज बनली ‘द हंड्रेड’ची चॅम्पियन, सुपरचार्जर्सच्या पदरी निराशा