दोन आठवड्यापासून थालंडमधील गुहेत अडकलेलल्या शाळेच्या फुटबॉल संघाची मंगळवारी (१० जुलै) सुटका झाली.
या थायलंडच्या शाळेच्या फुटबॉल संघाला फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅटिनो यांनी थायलॅन्ड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र लिहुन १५ जुलैला होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण दिले आहे.
“आम्हाला २३ जूनला समजले की थायलंडमधील गुहेत बारा फुटबॉलपटू आणि त्यांचे प्रशिक्षक अडकले आहेत. आम्हाला आशा आहे की या मुलांची सुखरुप सुटका होईल.” थायलंड फुडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांना लिहलेल्या पत्रात गियानी इन्फॅटिनो म्हणाले.
तसेच फिफाच्या अध्यक्षांनी या फुटबॉल संघाला आणि त्यांच्या प्रशिक्षकाला १५ जुलैला होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पहायला येण्याचे निमंत्रण दिले.
मात्र या मुलांना डॉक्टरांनी सुरक्षतेसाठी प्रवास टाळण्यास सांगितल्यामुळे या मुलांच्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पहण्यास जाण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोनाल्डोचा रियल मॅद्रिदला अखेर रामराम
-फिफा विश्वचषक:बेल्जियमचा पराभव करत फ्रान्सने तिसऱ्यांदा गाठली अंतिम फेरी








