---Advertisement---

शेन वॉर्नचा मृत्यू संशयास्पद? थायलंड पोलिसांनी दिली नवीन माहिती

On: रविवार, मार्च 6, 2022 6:48 PM
Shane-Warne
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे शक्रवारी (४ मार्च) आकस्मित निधन झाले. थायलंडमध्ये स्वतःच्या मालकिच्या विलामध्ये वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मावळली. वॉर्नच्या व्यवस्थापनाने याविषयी माहिती देताना मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले होते. आता याप्रकरणी थायलंड पोलिसांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

थायलंड पोलिसने (Thailand Police) खुलासा केला की, ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या छातीत दुखले होते. शेन वॉर्न (Shane Warne) याला आधीपासून अस्थमा आणि हृदयाशी संबंधित त्रास सुरू होता. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, हॉलिडे आयलंड विलामध्ये माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या झालेल्या मृत्यूमध्ये कसल्याही प्रकारची गडबड नाही. पोलीस अधिकारी युताना सिरिसोम्बतने खुलासा केला की, त्यांच्या शरीरात कोणतेही विषारी औषध किंवा पदार्थ आढळला नाहीय.

रक्ताच्या डागांविषयी माहिती आली होती समोर
द बेंकॉक पोस्टमधील एका वृत्तानुसार शेन वॉर्न ज्या खोलीत राहत होता, त्या खोलीच्या फर्शीवर, अंघोळ केलेल्या टॉवेलवर रक्त लागले होते. पोलीस कमांडर पोल मेजर जनरल सतीत पोलपिनिट यांनी याविषयी थायलंडचे वृत्तपत्र मटिचोनला माहित दिली. ते म्हणाले की, सीपीआर सुरु झाल्यावर कफ आणि रक्तस्त्राव होत होता. दरम्यान, आधी सांगितल्याप्रामाणे, वॉर्न बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याच्या चार मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. तसेच वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले, पण वॉर्न शुद्धीवर आला नाही. त्यानंतर त्याला मृत घोषित केले गेले.

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडमध्ये गेलेला वॉर्न
दरम्यान, शेन वॉर्नचा मॅनेजर जेम्स एर्स्किनने फॅक्स क्रिकेटला माहिती दिली की, त्याच्याकडे तीन महिन्यांची सुट्टी होती आणि त्याचा आनंद घेण्यासाठी वॉर्न थायलंडमध्ये आला होता. ही त्याच्या सुट्टीची सुरुवातच होती. तो याठिकाणी एक रात्र आधीच आला होता. पाच वाजता त्याला बाहेर जायचे होते. साधारणतः सव्वा पाच वाजता त्याच्या दरवाजा वाजवला गेला. म्हटले गेले की, बाहेर ये नाहीतर उशीर होईल. त्यानंतर कसल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा आम्हाला अंदाज आला की, काहीतरी गडबड आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘शेन वॉर्नने मला मोठा मंच उपलब्ध करून दिला’, नाबाद १७५ धावा ठोकल्यानंतर ‘रॉकस्टार’ जडेजा भावुक

विश्वचषकात मिताली ‘राज’! पाकिस्तानविरुद्ध मैदानात पाय ठेवताच भारतीय कर्णधाराने रचला विश्वविक्रम

BREAKING: ‘मिशन वर्ल्डकप’ची भारतीय महिलांनी केली विजयी सुरुवात! पाकिस्तानवरील १००% विजयाचा रेकॉर्ड कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---