महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक थरारक विजय मिळवून दिला आहेत. धोनी तसा स्वभावाने शांतच आहे. म्हणूनच त्याला मैदानात ‘कॅप्टनकूल’ अशी उपाधी देण्यात आली होती. तो जसा त्याच्या मैदानातील अनोख्या निर्णयाबद्दल चर्चेचा विषय ठरायचा. तसाच त्याच्या निराळ्या लूकसाठी देखील चर्चेत राहायचा आणि आताही राहतो.
धोनीने त्याच्या क्रिकेटमधील पदार्पणापासून आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या लूकने चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. आता अशाच एका नवीन लुकमध्ये महेंद्रसिंग धोनी दिसत आहे. स्टार स्पोर्ट्सने गुरुवारी (१९ ऑगस्ट) एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये धोनी एका ‘रॉकस्टार’च्या अवतारात दिसत आहे. यात लिहिले आहे, ‘पिक्चर अभी बाकी है.’ बघता बघता हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
#MSDhoni's up to something new before #VIVOIPL! 🧐
Stay tuned for the Asli Picture!#AsliPictureAbhiBaakiHai pic.twitter.com/4w51ynIrs0
— Star Sports (@StarSportsIndia) August 19, 2021
आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात स्टार स्पोर्ट्सने धोनीचा एक प्रोमो प्रसिद्ध केला होता. तेव्हा धोनीचा लूक एका बौद्ध भिक्षूसारखा केला होता. त्या लूकमध्ये धोनीने पूर्ण केस काढले होती. धोनीचा तो लूक एका जाहिरातीसाठी होता. तो लूक देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, वर्षभरापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाकडून खेळतो. गेल्या हंगामात आयपीएलमध्ये सीएसकेचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले होते. त्यामुळे धोनी आयपीएलमधून देखील निवृत्ती घेणार असल्याची बातमी समोर येत होती. मात्र या सगळ्या अफवा असल्याचे म्हणून सीएसकेसाठी आणखीन काही वर्षे खेळणार असल्याचे देखील धोनीने स्पष्ट केले होते.
तसेच आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात धोनीचा संघ सीएसके चांगल्या लयीत दिसला. सीएसकेने ७ मधील ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे १० गुणांसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तसेच १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नईचा संघ यूएईला रवाना झालेला आहे. त्याचबरोबर आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–आवाज होऊ दे पलटण! मुंबई इंडियन्सचा क्वारंटाईन संपला, ‘या’ दिवशीपासून लागणार सरावाला
–‘हे’ २ शिलेदार विराटला देणार धक्का, युएईतील राहिलेल्या आयपीएल हंगामातून घेऊ शकतात माघार
–नुकतीच ठोकलीत २ शतके, आता थेट टी२० विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार ‘जोश इंग्लिश’; वाचा त्याच्याबद्दल