---Advertisement---

“डीआरएस नहीं लेंगे, चिंता मत कर,” धोनीचा मजेदार व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

---Advertisement---

नवी दिल्ली। प्रतिष्ठित टी२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. या परिस्थितीत सर्व संघ जोरदार सराव करीत आहेत. यातच चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) हा तीन वेळचा चॅम्पियन संघदेखील तयारीमध्ये व्यस्त आहे. ज्याचा कर्णधार एमएस धोनीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

१५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित करणारा धोनी (MS Dhoni) युएईमध्ये कठोर परिश्रम घेत आहे.

आयपीएल २०२० चे नवीन वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारतात वाढत्या कोव्हिड- १९ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणार आहे. आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघ कसून सराव करीत आहेत, तर खेळाडू सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो-व्हिडिओ शेअर करीत आहेत.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज हे एकमेकांना भिडणार आहेत. सीएसके संघाचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू धोनी जोरदार सराव करीत आहे. मैदानावर सराव करताना धोनीची मजेदार शैली देखील पाहायला मिळत आहे. त्याचाच एक व्हिडिओ सीएसके संघाने शेअर केला आहे.

सीएसकेने धोनीसह संघाच्या इतर खेळाडूंच्या सरावाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनीशिवाय अनुभवी शेन वॉटसन, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा यांच्यासह अनेक खेळाडू सराव करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये धोनीची एक व्हिडिओ क्लिप टाकण्यात आली आहे, ज्यामध्ये तो मजेदार पद्धतीने म्हणत आहे की, “डीआरएस नहीं लेंगे, चिंता मत कर.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएलमधून प्रथमच मैदानात परतणार आहे. तो सीएसकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएलची चमकदार ट्रॉफी चौथ्यांदा आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने सीएसकेचे प्रयत्न असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-गब्बर म्हणतो, आता केवळ ज्युनिअरचं नव्हे तर सिनियर खेळाडूही घेणार ‘या’ खेळाडूकडून धडे

-ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!

-तो ठरणार बीग बॅश लीगमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय क्रिकेटर!

ट्रेंडिंग लेख-

-रोहित-धोनी नव्हे तर ‘हे’ ३ क्रिकेटर्स आयपीएल २०२०मध्ये पटकावतील सर्वाधिक षटकार मारण्याचा अवॉर्ड

-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!

-यंदा आयपीएल पदार्पणातच हे ३ युवा फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ चे आहेत प्रमुख दावेदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---