श्रेयस अय्यर आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघांचे नेतृत्व करणार आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने त्याचे कौतुक केले आणि आगामी काळात तो चांगला कर्णधार होईल अशी आशाही व्यक्त केली आहे. आयपीएल २०२०चे आयोजन युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होईल.
धवनने रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “एक संघ म्हणून आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहोत. आमचा आत्मविश्वास पूर्ण आहे. आम्ही सर्वजण क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहोत आणि संघात आवश्यक असलेली उर्जा व परस्पर सामंजस्य निर्माण करीत आहोत. मला वाटते की युएईची परिस्थिती पाहता आमच्याकडे एक संतुलित संघ आहे.”
‘मागच्या हंगामात दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे श्रेय श्रेयसला मिळाले’
बर्याच दिवसानंतर दिल्लीने मागच्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आणि त्याचे संपूर्ण श्रेय संघ आणि युवा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या एकत्रित प्रयत्नांना जाते.
श्रेयस मोकळ्या मनाने शिकू शकतो
धवन म्हणाला, “संघात काही अनुभवी खेळाडूंच्या आगमनाने कर्णधार म्हणून श्रेयसला मदत होईल. मागील हंगामात अय्यरने संघाचा कर्णधार म्हणून अतिशय चांगले काम केले. आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्या आगमनानंतर त्यांचा अनुभव अय्यरला मदत करेल. ते त्याला आपला अनुभव सांगतील. हे संघासाठीही खूप चांगले असेल. मला असे वाटते की अय्यरकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघेही शिकू शकतात. तो संघाचे नेतृत्व योग्य दिशेने करेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!
-तो ठरणार बीग बॅश लीगमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय क्रिकेटर!
-चुकिला माफी नाही, विराटच्या आरसीबीच्या एका चुकिला राजस्थानने केले नाही माफ
ट्रेंडिंग लेख-
-विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!
-असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्सला बनवू शकतात आयपीएल २०२० चा विजेता






