भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला गेला. या रंगतदार सामन्यात भारतीय संघाने 70 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्याला राजकारणी ते कलाकार आणि आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. त्यात बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते, ज्यांना चाहते ‘थलायवा’ म्हणून ओळखतात अशा रजनीकांत यांच्याही नावाचा समावेश होता. ते भारतीय संघाचा डाव पाहून खूपच खुश झाले होते. अशात भारतीय संघाविषयी रजनीकांत यांची प्रतिक्रिया चर्चेत आहे.
काय म्हणाले रजनीकांत?
विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia World Cup Final) संघात 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी रजनीकांत (Rajinikanth) यांनी विजयी संघाविषयी भविष्यवाणी केली आहे. रजनीकांत यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हटले की, “आधी मला भीती वाटली. नंतर जेव्हा विकेट्स पडत गेल्या, तेव्हा सर्वकाही ठीक झाले. त्या दीड तासादरम्यान मी खूपच घाबरलो होतो, पण मला 100 टक्के विश्वास आहे की, विश्वचषक आपलाच आहे.”
उपांत्य सामन्याला कलाकारांची मांदीयाळी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात पार पडलेल्या पहिल्या उपांत्य सामन्याला अनेक कलाकारांनी वानखेडे स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. तेथील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. तसेच, रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त वानखेडेवर प्रेक्षकांच्या मध्ये अनेक ओळखीचे चेहरेही दिसले. त्यात विराट कोहली (Virat Kohli) याला चीअर करताना पत्नी अनुष्का शर्मा, डेविड बेकहॅम आणि याच्या बाजूला कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, विकी कौशल, शाहिद कपूर, मीरा राजपूत, सोहा अली खान, कुणाल खेमू आणि रणबीर कपूर यांचा समावेश होता.
अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअम सज्ज
जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमी 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्यासाठी उत्सुक आहेत. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे होणार आहे. 2003 नंतर पहिल्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत. अशात या सामन्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (thalaiva rajinikanth is 100 percent sure about india winning world cup 2023 trophy against australia final)
हेही वाचा-
Semi Final 2मध्ये 0 धावांचे योगदान देणाऱ्या बावुमाची पराभवानंतर लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमचे चरित्र…’
CWC Prize Money: फायनलची संधी हुकली, पण न्यूझीलंड-आफ्रिकेवर पैशांचा पाऊस; कमावले पाकिस्तानपेक्षाही जास्त