टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. मात्र, स्पर्धेचा शेवट गोड करण्यात ते कमी पडले. आफ्रिकेला विश्वचषक 2023च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 3 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे त्यांचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. आफ्रिका पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता, पण उपांत्य सामन्यात ते दुसऱ्या क्रमांकाच्या संघाप्रमाणे खेळले नाहीत. या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाची प्रतिक्रिया सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
काय म्हणाला बावुमा?
या सामन्यात पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) खूपच निराश झाला. त्याने म्हटले की, पॉवरप्लेमध्ये 4 सामने गमावले, तेव्हाच त्यांनी सामना गमावला होता. या हृदयद्रावक पराभवानंतर बावुमा म्हणाला, “हा पराभव शब्दात मांडता येऊ शकत नाही. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. अंतिम सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा. त्यांनी आज वास्तवात चांगला खेळ दाखवला. आमचे चरित्र आज समोर आले. आम्ही खूप लवचीकता दाखवली. ज्याप्रकारे आम्ही बॅट आणि चेंडूतून सुरुवात केली, ते निर्णायक होते, इथेच आम्ही सामना गमावला.”
उपांत्य सामन्यात 0 धावांचे योगदान देणारा बावुमा पुढे म्हणाला, “त्यांच्या आक्रमणाच्या गुणवत्तेसह परिस्थितीही त्यांच्यासोबत होती. त्यांनी वास्तवात आम्हाला दबावात टाकले. जेव्हा तुम्ही 4 बाद 24 धावसंख्येवर असता, तेव्हा तुम्हाला नेहमी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जेव्हा मिलर आणि क्लासेन तिथे होते, तेव्हा आम्ही काहीशी गती मिळवत होतो, पण दुर्दैवाने क्लासेन जास्त वेळ टिकू शकला नाही. मिलरची खेळी शानदार होती. यावरून आमच्या संपूर्ण संघाचे चरित्र दिसते, अशा दबावाच्या स्थितीत आणि विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात असे करणे असाधारण होते. पहिल्या 10 षटकात त्यांना 70च्या आसपास धावसंख्या केल्या आणि यामुळे वास्तवात इतर खेळाडूंना सज्ज होण्याची संधी मिळाली.”
‘मार्करम आणि महाराजने त्यांना दबावात टाकले’
आपल्या विधानाचा शेवट करताना बावुमा म्हणाला, “आमच्याकडे संधी होती, कठीण संधी होती, जे आम्ही गमावले. जर आम्ही त्यांचा फायदा घेतला असता, तर हा सामना नजीकचा ठरू शकला असता. एक युवा खेळाडूच्या रूपात जेराल्ड कोएट्जी वास्तवात आमचा योद्धा होता. त्यावेळी वेगवान गोलंदाजांसाठी फार काही घडत नव्हते, पण त्याने यष्ट्यांभोवती गोलंदाजी करणे आणि स्मिथची विकेट घेणे अविश्वसनीय होते. त्यांला क्रँप्स येत होते, पण तरीही त्याला गोलंदाजी करायची होती. क्विंटन कदाचित आपल्या कारकीर्दीची शेवट एका वेगळ्या प्रकारे करू इच्छित असेल. निकाल काहीही असला, तरीही मला वाटते की, त्याला त्याची ही वेळ नक्की आठवत राहील. तो दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जाईल.”
दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव
नाणेफेक जिंकत या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्यांनी 49.4 षटकात 10 विकेट्स गमावत 212 धावाच केल्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकात 7 विकेट्स गमावत 215 धावा चोपत पार केले. तसेच, 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी सज्ज झाले. (captain temba bavuma statement after defeat against australia in semi final of world cup 2023)
हेही वाचा-
CWC Prize Money: फायनलची संधी हुकली, पण न्यूझीलंड-आफ्रिकेवर पैशांचा पाऊस; कमावले पाकिस्तानपेक्षाही जास्त
टीम इंडियासाठी वाईट बातमी! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर होऊ शकतो ‘हा’ पठ्ठ्या