---Advertisement---

चाचा शिकागो यांनी मानले एमएस धोनीचे आभार, जाणून घ्या कारण

---Advertisement---

उद्या(16 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होणार आहे. या सामन्यासाठी सर्व चाहते उत्सुक आहेत. तसेच हा सामना पाहण्यासाठी कराचीमध्ये जन्म झालेले मोहम्मद बाशीर उर्फ चाचा शिकागो हे देखील मँचेस्टरला पोहचले आहेत.

चाचा शिकागो हे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे मोठे चाहते आहेत. तसेच त्यांचे आणि धोनीचे संबंधही 2011 च्या विश्वचषकापासून चांगले आहेत. चाचा शिकागो हे भारत-पाकिस्तान सामना पहायला नेहमी उपस्थित असतात.

विशेष म्हणजे 2011 च्या विश्वचषकात मोहाली येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या उपांत्य सामन्यापासून धोनीने त्यांना गेले 8 वर्षे जेव्हाही भारत-पाकिस्तान सामना झाला आहे, त्याचे तिकीटे उपलब्ध करुन दिली आहेत.

यावेळीही ते या सामन्याचे तिकीट न काढता शिकागोपासून मँचेस्टरपर्यंत प्रवास करुन आले आहेत. त्यांना खात्री आहे, धोनी त्यांना या सामन्याचेही तिकीट उपलब्ध करुन देईल.

चाचा शिकागोंनी याबद्दल खूलासा केला आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की ‘मी काल इथे आलो आणि मी पाहिले की लोक तिकीटासाठी 800-900 पाउंड खर्च करायला तयार आहेत. मँचेस्टरपासून शिकागोला जाण्याचा खर्चही एवढाच आहे. धोनीचे आभार की मला सामन्याच्या तिकीटासाठी संघर्ष करावा लागत नाही.’

चाचा शिकागो यांच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट असून त्यांचे शिकागोमध्ये रेस्टोरंट आहे. तसेच त्यांनी धोनीबरोबर असलेल्या त्यांच्या चांगल्या संबंधाबद्दलही खूलासा केला आहे.

ते म्हणाले, ‘ मी त्याला(धोनीला) फोन करत नाही, तो खूप व्यस्त असतो. मी संदेशाच्या(टेक्स्ट मेसेज) माध्यमातूनच त्याच्याशी संपर्कात राहतो. मी इथे यायच्या आधीच धोनीने मला तिकीटाबद्दल खात्री दिली होती.’

‘तो खूप चांगला व्यक्ती आहे. त्याने मोहालीतील 2011 मध्ये झालेल्या सामन्यानंतर जे माझ्यासाठी केले आहे, मला नाही वाटत कोणी दुसरे त्याचा विचार करु शकतो.’

‘कल्पना करा बहुतेकांना ज्या तिकीटासाठी नशिबावर अवलंबून रहावे लागते ते तिकीट मला मोफत मिळते. मी त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणले आहे, आशा आहे की मी त्याला आज देईल.’

तसेच त्यांची आणि भारताचा मोठा चाहता सुधीर गौतमची चांगली मैत्री आहे. या मैत्रीबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘मी एक रुम बूक केली आहे आणि आम्ही(चाचा आणि सुधीर) एकत्र राहणार आहे. माझे सध्या आर्थिकदृष्या चांगले चालू आहे आणि मी माझ्या मित्रासाठी किमान एवढे तर करु शकतो.’

‘मी नुकतेच सुधीरला एक फोन भेट दिली आहे. त्यामुळे तो आनंदी झाला आहे. या छोट्या गोष्टी तूम्हाला आयुष्यात आनंद देतात.’

चाचा शिकागो यांनी यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंचीही भेट घेतली आहे.

Photo Courtesy: Twitter/Sudhir10dulkar

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: श्रीलंका संघाने केले गंभीर आरोप, आयसीसीकडे केली तक्रार

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी मास्टर ब्लास्टरने टीम इंडियाला दिला खास सल्ला

विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून शिकतोय पाकिस्तानचा हा फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment