मुंबई । 1999 साली दिल्ली कसोटीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना अनिल कुंबळे यांनी एका डावात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ चारी मुंडय़ा चीत झाला. याच सामन्याची आठवण अनिल कुंबळे यांना पुन्हा झाली. अशी अविश्वसनीय कामगिरी करेल याचा त्यांनाही विश्वास नव्हता.
जीम लेकरनंतर डावात 10 बळी घेणारा कुंबळे हा दुसरा गोलंदाज ठरला. कुंबळेंनी या ऐतिहासिक सामन्याविषयी आठवणी सांगतांना म्हणाले, “जर डीआरएस असते तर त्यांनी आधीच 10 विकेट घेतल्या असत्या.’
अश्विनने कुंबळेला आठवण करुन दिली की शेवटची विकेट घेताना ते मागे सरकले होते, त्यावेळी पंच जयप्रकाश उचलून घेईल असे वाटत होते. मात्र, कुंबळे यांनी याचा इन्कार केला. रविचंद्रन अश्विनशी बोलताना कुंबळे म्हणाले की, हे आश्चर्यकारक आहे. मला वाटते प्रत्येकाला या सामन्याचा एक भाग व्हायचे होते. कदाचित जय देखील असा विचार करीत असेल की त्याच्यासाठीही हा एक विशेष क्षण होता. मला माहित आहे की जय बंगळुरुचा आहे अशी बरीच चर्चा होती, पण तो पंच आहे. जेव्हा मी पंचांना विकेटचे श्रेय देतो तेव्हा ते मूर्खपणाचे आहे असे मला वाटते. जर डीआरएस असते तर त्याने आधीच 10 विकेट पूर्ण केल्या असत्या.”
कुंबळे म्हणाले की, मी डावात सर्व 10 विकेट घेण्याचा विचार कधी केला नव्हता. फक्त मला माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची होती. जेव्हा मी सहा विकेट घेतल्या तेव्हा टी ब्रेक होता, त्यानंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा मी दमलो होतो. लंच पासून ते टी पर्यंत सतत गोलंदाजी करत राहिलो. मला थकवा जाणवत होता. चहापानच्या वेळी मी ड्रेसिंगरुममध्ये परतल्यानंतर मी माझी कामगिरी अधिक सुधारु शकतो, असा विश्वास मला वाटू लागला.”
“मी सर्व 10 विकेट घेण्याचा कधीही विचार केला नाही. आपण सर्व 10 विकेट घेऊ असा विचार करुन तुम्ही सामन्यात जात असाल असे मला वाटत नाही. तथापि, आपण तशाच प्रकारे तयारी करत असतो,” असे कुंबळे यांनी सांगितले.