---Advertisement---

“त्यांचा पराभव करणे सोपे”, सामन्यानंतर डेविड मिलरचे टीम इंडियाबाबत वक्तव्य

On: सोमवार, फेब्रुवारी 23, 2026 1:20 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेने नेहमीच भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली टक्कर दिली आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) पुन्हा एकदा त्याचा अनुभव आला. आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या सुपर-८च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले. भारत हा सामना गमावेल अशी आशाही नव्हती आणि त्यात हा भारताचा टी२० विश्वचषकातील मोठा पराभव ठरला. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच ठरलेल्या डेविड मिलरने भारताबाबत चकित करणारे विधान केले आहे.

सामन्यानंतर मिलर पत्रकारांशी बोलत होता. तो म्हणाला, “भारत एक उत्तम संघ आहे, मात्र त्यांना हरवले जाऊ शकते. मला वाटते या स्पर्धेत आम्हाला सोप्या पद्धतीने खेळत आमचे काम पूर्ण करायचे आहे. एका खेळाडूच्या मते आम्हाला एका विशिष्ट शैलीत राहून काम करण्यावर भर दिला पाहिजे आणि ते काम पूर्ण केले पाहिजे. तेच आम्ही करत आहोत.”

“आम्ही एक परिपक्व संघ आहोत. अनेक खेळाडू एकमेंकासोबत खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठीही खूप क्रिकेट खेळले आहेत आणि हे दबावाच्या क्षणी कामी येते. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने खेळत काम पूर्ण करत राहणे, मग अजून काय पाहिजे आहे”, असेही मिलरने म्हटले आहे. यावेळी त्याने त्याच्या गोलंदाजांचेही कौतुक केले आहे.

मिलर म्हणाला, “जसे की मी म्हटले संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यांच्यात अनेक बदल दिसले. लुंगी एनगिडि धिम्या गतीने चेंडू टाकत होता. भारताची फलंदाजी संकटात आली होती, असेही मला वाटले. केशव महाराज एक अनुभवी खेळाडू आहे. दबावाच्या स्थितीत सहा डावखुऱ्या फलंदाजांना चेंडू टाकणे हे एक अवघड कार्य असून त्यांनी चांगला खेळ केला. मला एका क्षणी त्यांची फलंदाजी भीतीदायक वाट होती, मात्र आम्ही नंतर सरस ठरलो.”

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेची स्थिती वाईट होती. त्यांनी ३.६ षटकात २० धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यावेळी मिलर खेळण्यास आला. त्याने चौथ्या विकेटसाठी डेवाल्ड ब्रेविससोबत ९७ धावांची भागीदारी केली. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ६३ धावा केल्या. त्यामुळे त्यांनी २० षटकात ७ विकेट्स गमावत १८७ धावा केल्या होत्या.

भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना १८.५ षटकात सर्व विकेट्स गमावत १११ धावा केल्या होत्या. तसेच मिलरच या सामन्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---