इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर, अंबाती रायडूने देखील क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. रायुडूची भारतीय संघातील सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये गणना केली जाते. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघामध्ये त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. पण जेव्हा संघाची घोषणा झाली आणि रायडूच्या जागी विजय शंकरचे नाव घोषित करण्यात आले तेव्हा तमाम क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर अंबाती रायडूने मौन सोडले आहे.
रायडूने धक्कादायक खुलासा केला
अंबाती रायडूने (Ambati Rayudu) एका खाजगी वाहिनीला दिलेल्या निवेदनात सांगितले की, 2018 मध्येच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने त्याला 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup) तयार राहण्यास सांगितले होते. मात्र, त्याचवेळी रायडूने आपल्या वक्तव्यात भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनाही यासाठी जबाबदार धरले आहे. एकदिवसीय विश्वचषक 2019 साठी भारतीय संघाची निवड झाली, त्यावेळी एमएसके प्रसाद संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडत होते. रायुडूची संघात निवड झाली नसताना त्यांनी ट्विटरवर थ्रीडी चष्मा ट्विट केला, जो खूप वेगाने व्हायरल झाला.
अष्टपैलू खेळाडूची निवड झाल्याचा मला राग आला
एकदिवसीय विश्वचषक संघात न निवडल्याबद्दल आपल्या वक्तव्यात रायडू पुढे म्हणाला की, “तू एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहेस की लीग सामन्यासाठी संघ निवडला आहेस? माझ्या जागी फलंदाजीत माझ्यापेक्षा सरस खेळाडू निवडला गेला तर मला काहीच अडचण नव्हती. पण चौथ्या क्रमांकासाठी त्यांनी माझ्याऐवजी अष्टपैलू खेळाडूची निवड केली. ज्याचा मला राग आला होता.”
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?