श्रीलंका सध्या राजकीय आणि आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. याच कारणास्तव यावर्षी खेळवला जाणारा आशिया चषक श्रीलंकेऐवजी आता यूएईमध्ये पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशिया चषक २०२२ सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवासांचा कालावधी बाकी आहे. अशातच आता आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांनी स्पर्धा खेळवण्यासाठी पर्यायी ठिकाणांवर चर्चा सुरू केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार यूएईमध्ये एसीसी आणि अमीरात क्रिकेट बोर्डमध्ये याच विषयावर नुकतीच एक बैठक पार पडली आहे.
आशिया चषकाची सुरुवात २६ ऑगस्टपासून होणार आहे. तसेच स्पर्धेचा शेवटचा सामना ११ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्यात पार पडलेल्या या बैठकीत आशिया चषक २०२२ विषयी महत्वाची चर्चा झाल्याचे समोर येत आहे. आशिया चषकाचे आयोजन जरी श्रीलंकेऐवजी दुसरीकडे केले गेले, तरी स्पर्धेची तारीख मात्र बदलली जाणार नासल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी (१६ जुलै) एसीसीच्या एका सदस्याने स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. अधिकारी म्हणाला की, “सध्याची परिस्थिती पाहता असे वाटत आहे की स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी योग्य वेळ नाहीये. नियोजनात बदल होण्याची दाट शक्यता आहे. योगायोगाने नुकतेच श्रीलंकन बोर्डाने ऑस्ट्रेलियन संघासोबतच्या मालिकेत यशस्वीपणे जयमानपद भूषवले. आता बोर्ड पाकिस्तान संघाच्या आयोजनासाठीही तयार आहे.”
असे असले तरी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मात्र एसीसीपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करत आहे. पीसीबीच्या म्हणने आहे की, “आमची पहिली प्राथमिकता श्रीलंकन संघाला समर्थन देण्याची आणि याठिकाणी आशिया चषकाचे आयोजन करण्यासाठी आहे. जर ही स्पर्धा तिथे झाली नाही, तर त्यांना खूप नुकसान होईल. ऑस्ट्रेलियाने नुकताच कोणत्याही अडचणीशिवाय हा दौरा पूर्ण केला आहे. त्याव्यतिरिक्त पाकिस्तान संघही श्रीलंका दौऱ्यावर आहे.”
दरम्यान, पाकिस्तान संघाच्या श्रीलंका दौऱ्याविषयी बोलायचे झाले, तर संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळण्यासाठी या दौऱ्यावर गेला आहे. उभय संघातील पहिला कसोटी सामना शनिवारी (१६ जुलै) सुरू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे की, आशिया चषक २०२२ चे आयोजन श्रींलकन क्रिकेट बोर्डाने सरकारच्या दबावात केले होते. पण आता देशात नवीन सरकार बनल्यानंतर आशिया चषकही दुसरीकडे हलवला जाण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानची समाधानकारक कामगिरी, नावावार केला खास विक्रम
ENGvsIND : बुमराहची जागा घेणाऱ्या सिराजचा इंग्लंडला दणका, दोन धुरंधरांना शून्यावर धाडले तंबूत
VIDEO: हसन अली पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर! आता ‘या’ कारणाने होतोय जबरदस्त ट्रोल