शेवटचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2024 मध्ये आयोजित करण्यात आला होता. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या या विश्वचषकात टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.(Team India won the title under the leadership of Rohit Sharma)
आता 2026 मध्ये हा विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी येणार आहे. आतापर्यंत 15 संघांनी या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे आणि एकूण 20 संघ त्यात सहभागी होणार आहेत.
अलिकडेच, इटालियन संघ युरोपियन पात्रता स्पर्धेत या विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इटालियन संघ आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे (For the first time in cricket history, the Italian team qualifies for an ICC tournament). 20 संघांसाठी 4 गट तयार केले जातील आणि सर्व गटांमध्ये प्रत्येकी 5 संघ ठेवले जातील.
या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानच्या संघांना एकाच गटात ठेवण्यात येईल. हा विश्वचषक 2026 च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित केला जाईल.






