भारतीय संघाने गेल्या 2 दशकात सौरव गांगुली पासून विराट कोहलीपर्यंत अनेक कर्णधार पाहिले. दरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळून संघाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघाची कामगिरी उंचावली.
सर्वाधिक यशस्वी कर्णधारांच्या यादीत गांगुली आणि धोनीला आघाडीवर आहेत. यादरम्यान असे काही दिग्गज खेळाडू होते, ज्यांना एकदाही संघाची कमान सांभाळण्याची संधी मिळाली नाही. या लेखात आपण त्या नावांची चर्चा माहिती घेऊ.
जहीर खान – या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आपल्या स्विंग, वेग आणि रिव्हर्स स्विंगने परदेशी फलंदाजांना घाम फोडला होता. 2003 आणि 2011 च्या विश्वचषकात जहीरने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर संघाच्या यशात भर घातली. मुख्य गोलंदाज आणि दिग्गज नाव असूनही त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनण्याची संधी मिळाली नाही.
व्हीव्हीएस लक्ष्मण- साल 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू लक्ष्मणला कोण विसरू शकेल. ‘मनगटाचा जादूगार’ म्हणून ओळख मिळवलेला हा भारताच्या मुख्य कसोटी फलंदाजांपैकी एक होता. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या. मात्र, लक्ष्मणला एकदाही भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा बहुमान मिळाला नाही.
युवराज सिंग – “सिक्सर किंग” म्हणून प्रसिद्ध असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये युवराज सिंगचे सलग सहा षटकार कोण विसरू शकेल. धोनीच्या आधी त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि एकदिवसीय क्रिकेटमधील मधल्या फळीतील एक प्रमुख खेळाडू बनला. अनेक मॅचविनिंग खेळी खेळणाऱ्या युवराज सिंगला एकदाही भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
जरा बचके!! न्यूझीलंडचे ‘हे’ ५ शिलेदार भारतीय संघासाठी ठरू शकतात ‘खलनायक’
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत – न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी? जाणून घ्या एका क्लिकवर
न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू टीम इंडियाला आव्हान देण्यास सज्ज, मुंबईमध्ये झाला होता जन्म