क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो. आयपीएलसारख्या मोठ्या स्तरावरील स्पर्धेतही ‘सामनावीर’ पुरस्कार मिळवणे फार कठीण आहे. असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये अनेकदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. या लेखात त्या ३ खेळाडूंबद्दल जाणून घेतले आहे, ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
३. डेव्हिड वॉर्नर (David Warner) – १७
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची आयपीएल कारकीर्द जबरदस्त आहे. त्याने १२६ सामन्यात ४३.१७ च्या सरासरीने आणि १४२.३९ च्या स्ट्राइक रेटने ४७०६ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने आयपीएल २०१७ आणि २०१९ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली आहे. तसेच त्याने २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादला आपल्या नेतृत्वात चॅम्पियन बनवले.
आयपीएलच्या इतिहासात डेव्हिड वॉर्नरने १७ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. सध्या तो सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असून संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.
२. एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) – २०
एबी डिव्हिलियर्सने आयपीएलच्या १५४ सामन्यांत ३९.९५ च्या प्रभावी सरासरीने एकूण ४३९५ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ३३ अर्धशतके आणि ३ शतकेही केली आहेत. याव्यतिरिक्त त्याने आयपीएलमध्ये एकूण २१२ षटकार मारले आहेत.
ख्रिस गेलनंतर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज आहे. आयपीएल २०२० मध्ये आरसीबीच्या संघाला या स्टार प्लेयरकडून बर्याच अपेक्षा असतील.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर जिंकण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्स दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात एकूण २० सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत.
१. ख्रिस गेल (Chris Gayle) – २१
आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने २०१३ च्या आयपीएलमध्ये हे आश्चर्यकारक पराक्रम केले. ख्रिस गेलने २३ एप्रिल २०१३ रोजी पुणे वॉरियर्स संघाविरूद्ध फक्त ६६ चेंडूत १७५ धावांची स्फोटक खेळी केली. आयपीएल आणि टी२० क्रिकेट इतिहासातील एक फलंदाजाकडून खेळलेली ही सर्वोत्कृष्ट खेळी आहे. त्याचा हा विक्रम मोडणे तितकेसे सोपे नाही.
आयपीएलमध्ये ख्रिस गेलचे शानदार विक्रम आहेत. ख्रिस गेलने आयपीएलचे एकूण १२५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ख्रिस गेलने ४१.१३ च्या प्रभावी सरासरीने आणि १५१.०२ च्या स्ट्राइक रेटने ४४८४ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये २८ अर्धशतके आणि ६ शतके केली आहेत.
आयपीएलमधील सर्वाधिक ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही या दिग्गज खेळाडूच्या नावावर आहे. त्याने एकूण २१ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या मोसमात ऑरेंज कॅप जिंकू शकणारे ३ फलंदाज
आयपीएलमध्ये ३ वेगवेगळ्या संघांकडून अंतिम सामने खेळले हे २ खेळाडू…
आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…