आयपीएलच्या 12 व्या मोसमाला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सगळीकडे आयपीएलच्या चर्चांना उधान आले आहे. आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू कमाल करतात, पण त्याचबरोबर अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूही अनेकदा अफलातून कामगिरी करताना दिसतात.
यावेळीही 37 पेक्षा अधिक वय असणारे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंबरोबरच या वरिष्ठ खेळाडूंकडेही सर्वांचे लक्ष असणार आहेत.
37 पेक्षा अधिक वय असणारे हे खेळाडू आयपीएलमध्ये करु शकतात धमाका-
5. हरभजन सिंग –
मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीही हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. हरभजन 38 वर्षांचा असून त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 149 सामने खेळले आहेत. यात त्याने 134 विकेट्स घेतले आहेत आणि 800 धावाही केल्या आहेत. त्यामुळे तो चेन्नईसाठी फक्त अनुभवी गोलंदाज म्हणूनच नाही तर तळातला फलंदाज म्हणूनही फायदेशीर ठरु शकतो.
4. युवराज सिंग –
37 वर्षीय युवराज सिंग यावर्षी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. युवराजला यावर्षी मुंबई इंडियन्सने लिलावात मुळ किमतीत संघात सामील करुन घेतले आहे. युवराज जेव्हाही लयीत येतो तेव्हा तो तुफानी फलंदाजी करताना दिसतो. त्यामुळे यावर्षी मुंबईलाही त्याच्याकडून ही आपेक्षा असणार आहे. तसेच युवराजची गोलंदाजीही मुंबईसाठी उपयोगी ठरु शकते.
3. एमएस धोनी –
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असणारा धोनी यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 37 वर्षीय धोनीने यावर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 4 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तसेच त्याने मागीलवर्षीही आयपीएलमध्ये चांगला खेळ केला होता. त्याने मागीलवर्षी 18 सामन्यात खेळताना 3 अर्धशतकांसह 75.83 च्या सरासरीने 455 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर त्याचे यष्टीरक्षण हे देखील चेन्नईसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 175 सामने खेळलेल्या धोनीकडून चेन्नईला यावर्षीही दमदार खेळाची अपेक्षा असेल.
2. शेन वॉटसन –
37 वर्षीय शेन वॉटसनने मागीलवर्षी चेन्नई सुपर किंग्जकडून शानदार खेळ केला होता. चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात वॉटसनचा मोठा वाटा होता. मागीलवर्षी आयपीएलमध्ये त्याने 15 सामन्यात 39.67 च्या सरासरीने 555 धावा केल्या होत्या. मागीलवर्षीच्या मोसमात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये 5 व्या क्रमांकावर होता.
त्याचबरोबर वॉटसनने पाकिस्तान सुपर लीगमध्येही(पीएसएल) यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. त्याला पीएसएलच्या या मोसमाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला. त्याने 43 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये यावर्षीही अशीच कामगिरी करण्यास वॉटसन उत्सुक असेल.
1. ख्रिस गेल –
39 वर्षीय ख्रिस गेल हा तर त्याच्या आक्रमक खेळीसाठीच ओळखला जातो. त्याने यावर्षीही विंडिज संघाकडून दमदार खेळ केला आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही तो हा फॉर्म कायम राखण्यास उत्सुक असेल.
ख्रिस गेलने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये तुफानी खेळ करताना 112 सामन्यात 41.18 च्या सरासरीने 3994 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याला क्रिकेटर घाबरतात तो खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यवर बाद
–आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूने केलेला तो विक्रम आजही कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही
–आयपीएलमध्ये गेल्या ११ वर्षात सुरेश रैनाने जे केले ते यावर्षीही करणार का?