चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमध्ये पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघात खेळण्यात आला. हा सामना न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव करत 60 धावांनी जिंकला. पाकिस्तान पहिल्यांदा गोलंदाजी मध्ये फेल झाला. त्यानंतर फलंदाजी करताना 100 हून अधिक डॉट चेंडू खेळणे पाकिस्तानला भारी पडले. या पराभवानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनल मध्ये जाण्याच्या आशांना धक्का बसला आहे.
पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते संघावर नाराज आहेत. त्याच सोबत आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटर कामरान अकमल यांनी पाकिस्तान संघावर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की पाकिस्तान संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळण्याचा हकदार नाही.
एका पाकिस्तानी मीडिया चॅनेलवर लाईव्ह चर्चा करताना कामरान अकमल यांनी पाकिस्तानच्या खेळातील प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, आत्ता आयरलैंड आणि जिम्बाब्वे यांच्यात मालिका खेळली जात आहे. पाकिस्तानला त्यांच्याविरुद्ध खेळले पाहिजे. जर पाकिस्तान त्यांच्याविरुद्ध खेळताना जिंकला तर पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचा हकदार होईल.
19 फेब्रुवारी रोजी न्युझीलँड विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तान संघाची गोलंदाजी खूप खराब होती. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शहा यांच्यासारखे प्रभावी गोलंदाज संघामध्ये असून सुद्धा, न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा 320 धावा केल्या. न्यूझीलंडने सामन्याच्या शेवटच्या 10 षटकारात 10 पेक्षा जास्त रन रेट ने धावा केल्या. नंतर पाकिस्तान संघानी धावांचा पाठलाग करताना फक्त 260 धावा केल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एका ग्रुपमध्ये चार संघांना स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. पण पाकिस्तान आधीच एक सामना हरला आहे. अशातच आता त्यांची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये जाण्याच्या आशांना झटका लागलेला आहे. आता पाकिस्तानला 23 फेब्रुवारी रोजी भारतीय संघाविरुद्ध तसेच 27 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध सामना खेळायचा आहे. जर पाकिस्तान संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचायचे असेल तर पुढचे दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील.
हेही वाचा
भारतीय संघाचा दबदबा कायम! गुणतालिकेतील नवीन समीकरणे जाणून घ्या
शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
विराट कोहली इतिहास रचणार? मोहम्मद अझरुद्दीनचा 25 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी






