---Advertisement---

शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 3:24 PM
---Advertisement---

बांग्लादेशला 6 षटकांनी हरवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची जोरदार सुरुवात केली आहे. मोहम्मद शमीच्या 5 विकेट नंतर फलंदाजीमध्ये शुबमन गिलने शतकी खेळी केली. सामना पाहण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा ब्रँड ॲम्बेसेडर शिखर धवन याने देखील हजेरी लावली होती. यादरम्यान शिखर धवन सोबत एक विदेशी महिला बसलेली दिसली. चाहत्यांमध्ये सध्या चर्चा चालू आहे की, ती विदेशी महिला कोण आहे? काही काळापूर्वीच शिखर धवनने घटस्फोट घेतला आहे. आता तो विदेशी महिलेला डेट करत आहे का, अशी चर्चा चालू आहे.

खरंच शिखर धवनने घटस्फोट घेतला आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिखर धवनला यापूर्वी देखील विदेशी महीलेसोबत विमानतळावरती पाहण्यात आले होते व आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात विदेशी महिलेसोबत शिखरला पाहण्यात आले आहे. या महिलेचे नाव सोफी आहे. इंस्टाग्रामद्वारे दोघेही एकेमकांना फॉलो करत आहेत. यामधून हे सिद्ध होते की त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.

शिखर धवनने आपल्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या आयशा मुखर्जी सोबत साल 2012 मध्ये लग्न केले. दोघांचा एक मुलगा देखील आहे. काही दिवसांपूर्वी आयशा आणि शिखर वेगळे झाले, दोघांनी घटस्फोट घेतला आहे. यानंतर शिखर आपले आयुष्य एकट्यानेच व्यतीत करत आहे. सोशल मीडिया द्वारे तो त्याच्या आणि मुलाच्या आठवणींना नेहमीच उजाळा देत असतो. शिखर धवनचा मुलगा आई आयशा सोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहतो.

  • शिखर धवन खूप आधुनिक विचारांचा आहे. आयुष्य आपल्या मर्जीने जगतो. शिखर धवन नेहमीच इंस्काटाग्रामवरती काही न काही हास्यास्पद पोस्ट शेअर करत असतो.

 

महत्वाच्या बातम्या : 

विराट कोहली इतिहास रचणार? मोहम्मद अझरुद्दीनचा 25 वर्षे जुना विक्रम मोडण्याची संधी

गिलची खेळी सोनेरी ठरली, टीम इंडियाने आयसीसी वनडे स्पर्धेत नवा मैलाचा टप्पा गाठला!

गिलने उलगडले त्याच्या संथ खेळीचे रहस्य, ड्रेसिंग रूममधून आलेला खास संदेश!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---