भारतीय फुटसाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांची उपस्थिती : विविध स्पर्धांचे नियोजन
पुणे : महाराष्ट्र राज्य फुटसाल संघटनेतर्फे घेण्यात येणाºया सबज्युनियर गटाच्या राज्य अजिंक्यपद फुटसाल स्पर्धा परभणी येथे, ज्युनियर गटाच्या नंदुरबार येथे आणि सिनियर गटाच्या स्पर्धा औरंगाबाद येथे होणार आहेत,अशी माहिती भारतीय फुटसाल संघटनेचे सचिव सुनिल पूर्णपात्रे यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही पूर्णपात्रे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य फुटसाल संघटनेची सर्वसाधारण वार्षिक बैठक डेक्कन जिमखाना येथे पार पडली. या वेळी २०१७ -१८ च्या फुटसाल व भारतीय शालेय महासंघाच्या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. राज्य अजिंक्यपद स्पर्धा, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे घेण्यात येणाºया शालेय फुटसाल स्पर्धा आणि शालेय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य फुटसाल संघटनेकडून घेण्यात येणार आहेत, असेही शिरगावकर यांनी सांगितले.
यावेळी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे सदस्य व भारतीय फुटसाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, अमित गायकवाड, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून २९ जिल्हयांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या वेळी औरंगाबाद जिल्हा फुटसाल संघटनेचे सचिव रणजीत भारद्वाज यांची महाराष्ट्र संघटनेचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या स्पर्धांमधून जागतिक शालेय महासंघाच्या स्पर्धेसाठी खेळाडू निवडण्यात येणार असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले.
सुनिल पूर्णपात्रे म्हणाले, संघटनेकडून नियोजित केलेल्या शालेय विभागीय स्पर्धा औरंगाबाद विभागात परभणी, नाशिक विभागात जळगाव, लातूर विभागात उस्मानाबाद तसेच पुणे, मुंबई,अमरावती, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहेत. शालेय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयोजनाखाली म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे होणार आहेत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे घेण्यात येणाºया शालेय फुटसाल स्पर्धांचे आयोजन प्रत्येक जिल्हयात जिल्हा संघटना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.