भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामाची (2023-24) घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेटच्या संघात अलिकडच्या काही वर्षांमध्ये अनेक खेळाडू असे आहेत, जे इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर राष्ट्रीय संघात सामील झाले आहेत. पण भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख मिळवून देण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट नेमहीच महत्वाचे राहिले आहे. आगामी हंगामातही अनेक युवा खेळाडू असे मिळतील, जे भविष्यात भारताचे प्रदर्शन करू शकतात.
आगामी रणजी हंगामात सुरुवात 5 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे, जो एकूण 70 दिवस खेळला जाईल. 14 मार्च रोजी रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जाईळ. रणजी ट्रॉफीतील लीग स्टेजचे सामने 19 फेब्रुवारी रोजी संपतील. तर बाद फरीचे सामने 23 फेब्रुवारीपासून खेळले जातील. देशांतर्गत क्रिकेटमधील दलीप ट्रॉफी 28 ते 16 जुलै दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर 24 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत देवधर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. रणजी ट्रॉफी विजेता संघ (सौराष्ट्र) आणि रेस्ट ऑफ इंडिया संघातील ईरानी चषक 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल.
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर यादरम्यान आयोजित केली जाईळ. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान विजय हजारे ट्रॉपी खेळवली जाईल. (The BCCI has announced the schedule for the upcoming season of domestic cricket)
महत्वाच्या बातम्या –
बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी
अँडरसन काय थांबेना! केरीच्या यष्ट्या उद्ध्वस्त करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पूर्ण केले 1100 बळी