भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेलत आहेत. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत भारताला तिन्ही क्रिकेट प्रकारांच्या मालिका खेळायच्या आहेत. पण त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याच्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे वरिष्ठ खेळाडू खेळत नाहीयेत. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पुढचे दोन सामने निर्णायक असणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत देखील विश्रांतीवर असण्याची शक्यता मागच्या काही दिवसांपासून वर्तवली जात आहे. अशातच बुधवारी (29 नोव्हेंबर) बातम्या समोर येत आहेत की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित संघाचे नेतृत्व करू इच्छित नाही. पण बीसीसीआय कर्णधारपदा सांभाळण्यासाठी रोहितचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही टी-20 मालिका 10 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना डरबनमध्ये आयोजित केला गेला आहे. 12 डिसेंबर रोजी गकेबराहामध्ये दुसरा, तर 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये मालिकेतील तिसार सामना खेळला जाईल. असेही सांगितले जात आहे की, या मालिकेत भारतीय संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी दिली जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली अशा वरिष्ठ खेळाडूंच्या खेळण्यावर संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी (30 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
दरम्यान, मागच्या एका वर्षात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकही टी-20 सामना खेळला नाहीये. यादरम्यान, संघ बहुतांश वेळा हार्दिक पंड्या याच्याच नेतृत्वात खेळला आहे. पण विश्वचषकादरम्यान, दुखापतीमुळे बाहेर बसलेला हार्दिक दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी फिट असेल की नाही, याबाबत अद्याप कुठीलच ठोस माहिती समोर आली नाहीये. अशात आगामी टी-20 मालिकेत भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न कायम आहे. (The BCCI is in talks with Rohit Sharma to lead India in the T20I series against South Africa)
महत्वाच्या बातम्या –
पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी अभय छाजेड, सचिवपदी राजीव कुलकर्णी, खजिनदारपदी रोहित घाग यांची निवड
IND vs AUS । ज्याच्यामुळे शतक वाया गेले, त्यालाच पाठीशी घातले! पाहा पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला






