---Advertisement---

IPL 2025 साठी बीसीसीआयचे कडक नियम! ‘व्हीआयपी संस्कृती’ संपवण्याचा निर्णय

On: बुधवार, मार्च 5, 2025 9:00 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामाची (IPL 2025) सुरूवात (22 मार्च) पासून सुरू होईल, पण त्याआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कडक नियम बनवले आहेत. खेळाडूंच्या सरावापासून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यापर्यंत सर्व गोष्टींवर निर्बंध लादल्याच्या बातम्या येत आहेत.

सोप्या शब्दांत सांगायचे बोलायचे झाल्यास, बीसीसीआयने संघांमधील ‘व्हीआयपी संस्कृती’ संपवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सर्व 10 फ्रँचायझींशी संपर्क साधला आहे आणि सर्व संघ व्यवस्थापकांना ई-मेलद्वारे नवीन नियमांची माहिती दिली आहे. (BCCI Rules For IPL 2025)

नवीन नियमांनुसार, खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला आयपीएल सामन्यांदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सराव सत्रादरम्यानही, सहाय्यक कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना उपस्थित राहण्यास मनाई असेल. (Restrictions For Players)

बीसीसीआयने संघांना पाठवलेल्या मेलमध्ये असे लिहिले होते की, सराव सत्रादरम्यान केवळ मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनाच खेळाडूंना भेटण्याची परवानगी असेल. त्याच वेळी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि मित्र इतर वाहनांमधून मैदानावर पोहोचू शकतात आणि ते काही अंतरावर बसून सराव सत्र पाहू शकतात. सपोर्ट स्टाफच्या बाबतीत, बीसीसीआयकडून परवानगी मिळाल्यानंतरच खेळाडूंना सपोर्ट स्टाफ सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

निवृत्तीनंतर काय आहेत स्टीव्ह स्मिथचे प्लॅन्स, स्वतःच केली मोठी घोषणा
विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची रंजक कहाणी, भांडणापासून मैत्रीपर्यंत! पहा एका क्लिकवर
CT 2025: भारताने केला ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---