---Advertisement---

“चेन्नई सुपर किंग्जने सर्व खेळाडूंना संघातून मुक्त करावे”, दिग्गजाचे खळबळजनक विधान

On: रविवार, नोव्हेंबर 22, 2020 11:06 AM
---Advertisement---

यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 14 पैकी 6 सामन्यात विजय मिळवले आणि ते 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानीच राहीला. त्यामुळे आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते नोंदवली आहेत. आता भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने चेन्नई सुपर किंग्ज संघाबद्दल आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

आकाश चोप्रा म्हणाले की, आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी होण्याअगोदर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघातील सर्व खेळाडूंना मुक्त करायला हवे. त्यांचे असे म्हणने आहे की, चेन्नई सुपर किंग्ज संघात असा कोणताही खेळाडू नाही, ज्याला आयपीएल मेगा लिलावात मोठी बोली लागू शकेल. त्यामुळे त्यांनी संघातील सर्व खेळाडूंना करारातून मुक्त करून लिलावासाठी उतरवले पाहिजे आणि पुन्हा संघात घ्यायला पाहीजे.

आकाश चोप्रा हे आपल्या युट्यूब चॅनेलवर आयपीएल 2021 च्या मेगा लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नियोजनाबद्दल बोलत होते . त्यांच्या म्हणण्यानुसार सीएसकेने पूर्णपणे आपल्या संघाची पुनर्बांधणी करायला हवी आहे.

ते म्हणाले ,”चेन्नई सुपर किंग्ज संघाला माझा सल्ला आहे की त्यांनी आपल्या पूर्ण संघाला पुन्हा तयार करावे. परंतु पूर्णपणे संघ बदलू नये कारण की, सॅम करन, एमएस धोनी, दीपक चाहर, फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांना तुम्हाला ठेवावे लागेल”.

आकाश चोप्राने सांगितले चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी काय नियोजन करायला पाहिजे

आकाश चोप्रा पुढे म्हणाले, “एक गोष्ट आहे, जी चेन्नई संघाला लक्षात ठेवावी लागेल की, जर मोठा लिलाव झाला तर काय त्यांच्या जवळ असे खेळाडू आहेत. ज्यांना माघारी घेण्यासाठी ते 12 किंवा 15 कोटी रुपये खर्च करतील. जर त्यांनी दीपक चाहरला सोडले तर लिलावात त्याला 15 कोटीची बोली लागेल का? किंवा सॅम करन आणि आणि डू प्लेसिस लिलावात महागडे ठरतील का?”

आकाश चोप्रा यांनी सांगितले, ” माझ्या हिशोबाने सीएसकेच्या जवळ असा कोणताही खेळाडू नाही. ज्याला सोडल्यानंतर तो लिलावात खूप महागडा ठरेल, आणि त्याला पुन्हा घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. यासाठी त्यांनी सर्व खेळाडूंना मुक्त करायला हवे आणि परत त्यांना घ्यायला पाहिजे. कारण की तुम्हाला ही गोष्ट सुद्धा डोक्यात ठेवायची आहे की, हा लिलाव पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे, अणि जे खेळाडू आता 37 वयाचे आहेत. ते नंतर 40 चे होतील आणि तेव्हा ते खेळण्याच्या अवस्थेत राहणार आहेत का.”

महत्त्वाच्या बातम्या –

विराटविरुद्ध ‘हा’ खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचं महत्वाचं शस्त्र

सेहवाग करतोय पुनरागमन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दिसणार ‘या’ भूमिकेत

‘लगान’ चित्रपटाचा फोटो शेअर करत माजी दिग्गजाने आर अश्विनला केले ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---