भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा सध्या चर्चेत आहे. जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांची जोडी मागच्या वर्षी चांगलीच चर्चेत राहिली. भारतीय जनता पक्षाकडून रिवाबा आमदार देखील झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या दोघांचा संसार सुखी चालल्याचे दिसते. पण प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच समोर येत आहे. रविंद्र जडेजा याचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनी आपला मुलगा रविंद्र आणि सून रिवाबा यांच्यावर मोठे आरोप केले आहेत.
माहितीनुसार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) लग्नानंतर पत्नी रिवाबासोबत वेगळा राहत आहे. दुसरीकडे त्याचे वडील एकटे जामनगरमध्ये राहत आहेत. अनिरुद्ध जडेजा (Anirudh Jadeja) यांनी नुकतीच दैनिक भास्करला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कौटुंबीक वाद सर्वांसमोर विस्ताराने मांडले आहेत.
मुलाखतीत अनिरुद्ध जडेजा म्हणाले की, “खरे सांगायचे तर माझा रवी (रविंद्र जडेजा) आणि त्याची पत्नी रिवाबाशी काहीही संबंध नाही. आम्ही त्यांना कशासाठीच बोलवत नाही आणि तेदेखील आम्हाला बोलवत नाहीत. रवीच्या लग्नानंतर तीन महिन्यात वादाला सुरुवात झाली होती. सथ्या मी जामनगरमध्ये एकटा राहतो. रविंद्र वेगळा राहतो. काय माहीत, पत्नीने त्याच्यावर काय जादू केली आहे. माझा तर तो मुलगा आहे, खूप वेदाना होतात. त्याचे लग्न झाले नसते, तर बरे झालेअसते. त्याला क्रिकेटपटू बनवलेच नव्हते पाहिजे. किमान आमच्यावर ही वेळ आली नसती.”
वडिलांनीच आपल्यावर अशाप्रकारे आरोप केल्यामुळे जडेजाकडे जास्त बोलण्यासारखे काही बाकी दिसत नाही. पण तरीही त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर करत स्वतःची बाजू मांडली आहे. जडेजाने ही पोस्ट गुजरातीमध्ये केली असून त्यात लिहिले आहे की, “मुलाखतीत बोलल्या गेलेल्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. माझी आणि माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रयत्न आहे. हे खूपच निंदनीय आहे. मलापण खूपकाही बोलायचं आहे. मात्र, मी या गोष्टी अशा सार्वजनिक ठिकाणी बोलणार नाही.”
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जडेजाने दुखापतीमुळे न खेळण्याचा निर्णय गेतला. उभय संघातील तिसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या सामन्यासाठी जडेजा संघात पुनरागमन करतो की नाही, हे पाहण्यासारखे असेल. (The controversy in Ravindra Jadeja’s family has reached everyone)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : बुमराह आणि अँडरसन यांच्यातील क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज कोण? जाणून व्हाल थक्क…
IPL 2024 : सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी; आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये ‘हा’ संघ प्रवेश करणारच…