मुंबई । भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढत आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना देखील याची कोरोनाची लागण होत आहे. नुकतेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या वहिनीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीच्या पत्नीचा आणि स्नेहाशीषच्या सासु-सासऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या व्यतिरिक्त स्नेहाशीषच्या मोमीनपूरच्या घरी असणाऱ्या घरगुती मदतनीसास देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांना दोन दिवसांपासून सर्दी, खोकला तसेच श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
स्नेहशीष, जो स्वत: माजी रणजी क्रिकेटपटू आहे, याचीदेखील विषाणूची तपासणी करण्यात आली होती पण त्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पण तरी त्याला होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांना खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्नेहाशीष सध्या बंगालच्या क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले गांगुलीचे नातेवाईक गांगुलीच्या वडिलोपार्जित निवासात राहत नव्हते तर दुसऱ्या घरात राहत होते. शनिवारी पुन्हा त्यांची चाचणी होईल. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.
ट्रेंडिंग घडामोडी –
२०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना फिक्स? श्रीलंकेने सुरु केली चौकशी
२४ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला
जेव्हा १७ वर्षांपुर्वी दु:खात आख्खा देश झाला होता लाॅकडाऊन