---Advertisement---

‘या’ ठिकाणी खेळला जाणार कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, आयसीसीने केली पुष्टी

On: बुधवार, फेब्रुवारी 8, 2023 9:59 PM
IND vs AUS (Rohit Sharma pat Cummins)
---Advertisement---

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे 2021-2023 च्या अंतिम सामन्याची तारीख निश्चित झाली. बुधवारी (8 फेब्रुवारी) आयसीसीने पुष्टी केली की कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या ‘द ओव्हल’ स्टेडियमवर खेळला जाईल. 12 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असल्यामुळे पावसामुळे सामना रद्द होण्याची भीती देखील नसेल.

लंडनच्या ‘द ओव्हल’ स्टेडियमला मोठा इतिहास आहे. याठिकाणी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत. अशात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हे मैदान योग्य असेल. अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत जून महिन्यात जे संघ पहिल्या दोन स्थानावर असतील, त्यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारे संघ 24 कसोटी मालिका आणि 61 कसोटी सामन्यांनंतर निवडले जातील. येत्या काही आठवड्यांमध्ये अंतिम सामन्यासाठीचे दोन संघ निश्चित होतील.

ऑस्ट्रेलिया सध्या अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारी पासून सुरू होईल. या मालिकेचा निकाल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निर्णायक ठरू शकतो. अंतिम सामन्यातील स्थान ऑस्ट्रेलियाने जवळपास पक्के केले आहे. दुसरीकडे अंतिम सामन्यात जागा पक्की करण्यासाठी भारतासमोर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल. श्रीलंका आणि आफ्रिका संघ अनुक्रमे गुणातालीकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकी संघाला मार्च महिन्यात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध दोन सामन्यांच्या दोन मालिका खेळायच्या आहेत. या मालिकेतील आफ्रिकी संघाचे प्रदर्शन स्पर्धेची पुढची दिशा ठरवेल.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavskar Trophy) सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू आणि चाहते उत्सुक आहेत. बुधवारी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळीह दोघांनीही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळम्याविषयी उत्सुकता दाखवली. (The date and venue for the final of the ICC World Test Championship has been decided)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

कर्णधार आणि प्रशिक्षकांचा निर्णय झाला! निवडकर्त्यांनी संघात घेतलेल्या 6 जणांना बसवणार संघाबाहेर
“मला त्या दोघांमधील टशन‌ पाहायचे आहे”, भारतीय दिग्गजाने व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---