पुढच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या टी-20 विश्वचषकाच्या तारखा समोर आल्या आहेत. 4 जुलै 2024 ते 30 जून 2023 यादरम्यान आगामी टी-20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांकडे या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद सोपवण्यात आले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. वृत्तानुसार अमेरिका आणि वेस्ट इंडीजमधील एकून 10 स्टेडियमवर टी-20 विश्वचषकाचे सामने आयोजित केले जाणार आहेत. माहितीनुसार आयसीसीची एक तुकडी नुकतीच यूएसएमधील काही स्टेडियमवर भेट देण्यासाठी गेली होती. या स्टेडियमवर पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये फ्लोरिडाचे लॉडरहिलदेखील सामील आहे, ज्याठिकाणी आधीही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले गेले आहे. येत्या काळात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामना याठिकाणी खेळला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मोरिसविले, डलास आणि न्यूयॉर्क या शहरांनाही निवडले गेले आहे.
मोरिसविले आणि डलास याठिकाणी सद्या मेजर लीग क्रिकेटचे सामने खेले जात आहेत. असे असले तरी, डलास, मोरिसविले आणि न्यूयॉर्क या स्टेडियमला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा दर्जा प्राप्त झाला नाहीये. आयसीसीच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यासाठी स्टेडियमवला आंतरराष्ट्री दर्जा प्राप्त पाहिजे. अशात या स्टेडियमविषयीचा अंतिम निर्णय आयसीसी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि यूएसए क्रिकेट बोर्ड यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या काळात घेईल.
नुकतेच आयर्लंड, स्कॉटलँड आणि पापुआ न्यू गिनी यांनी टी-20 विश्वचषकासाठी क्वॉलिफायर केले आहे. एकून 12 संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी आधीच पात्र झाले आहेत. याता जयमान वेस्ट इंडीज आणि यूएसए या दोन संघांनाही सामील केले जाईल. 2022 टी-20 विश्वचषकातील 8 सर्वोत्तम संघांनीही आधीच आगामी विश्वचषकासाठी क्वॉलिफाय केले आहे. यात 8 संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलंड, न्यूजीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका.
आगामी टी-20 विश्वचषकात एकून 20 संघ खेळणार असून ग्रुप स्टेजमध्ये चार संघात या संघांची विभागणी केली जाईल. यातून प्रत्येक ग्रुपमधील पहिल्या दोन संघांना सुपर 8 मध्ये स्थान मिळेल. त्यानंतर यातील प्रत्येकी चार-चार संघांचे दोन ग्रुप पाडले जातील. यातून पुढे उपांत्य फेरीसाठी सर्वोत्तम चार संघ निवडले जातील. (The date of T20 World Cup is understood! ICC’s tournament to be played in ‘these’ two countries)
महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’