• About Us
  • Privacy Policy
शनिवार, सप्टेंबर 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

टी20 विश्वचषकाची तारीख समजली! ‘या’ दोन देशात खेळली जाणार आयसीसीची प्रमुख स्पर्धा

टी20 विश्वचषकाची तारीख समजली! 'या' दोन देशात खेळली जाणार आयसीसीची प्रमुख स्पर्धा

Omkar Janjire by Omkar Janjire
जुलै 29, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
t20 world cup trophy

Photo Courtesy: t20worldcup.com


पुढच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. या टी-20 विश्वचषकाच्या तारखा समोर आल्या आहेत. 4 जुलै 2024 ते 30 जून 2023 यादरम्यान आगामी टी-20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांकडे या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद सोपवण्यात आले आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. वृत्तानुसार अमेरिका आणि वेस्ट इंडीजमधील एकून 10 स्टेडियमवर टी-20 विश्वचषकाचे सामने आयोजित केले जाणार आहेत. माहितीनुसार आयसीसीची एक तुकडी नुकतीच यूएसएमधील काही स्टेडियमवर भेट देण्यासाठी गेली होती. या स्टेडियमवर पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये फ्लोरिडाचे लॉडरहिलदेखील सामील आहे, ज्याठिकाणी आधीही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले गेले आहे. येत्या काळात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामना याठिकाणी खेळला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मोरिसविले, डलास आणि न्यूयॉर्क या शहरांनाही निवडले गेले आहे.

मोरिसविले आणि डलास याठिकाणी सद्या मेजर लीग क्रिकेटचे सामने खेले जात आहेत. असे असले तरी, डलास, मोरिसविले आणि न्यूयॉर्क या स्टेडियमला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा दर्जा प्राप्त झाला नाहीये. आयसीसीच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यासाठी स्टेडियमवला आंतरराष्ट्री दर्जा प्राप्त पाहिजे. अशात या स्टेडियमविषयीचा अंतिम निर्णय आयसीसी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि यूएसए क्रिकेट बोर्ड यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या काळात घेईल.

नुकतेच आयर्लंड, स्कॉटलँड आणि पापुआ न्यू गिनी यांनी टी-20 विश्वचषकासाठी क्वॉलिफायर केले आहे. एकून 12 संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी आधीच पात्र झाले आहेत. याता जयमान वेस्ट इंडीज आणि यूएसए या दोन संघांनाही सामील केले जाईल. 2022 टी-20 विश्वचषकातील 8 सर्वोत्तम संघांनीही आधीच आगामी विश्वचषकासाठी क्वॉलिफाय केले आहे. यात 8 संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलंड, न्यूजीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका.

आगामी टी-20 विश्वचषकात एकून 20 संघ खेळणार असून ग्रुप स्टेजमध्ये चार संघात या संघांची विभागणी केली जाईल. यातून प्रत्येक ग्रुपमधील पहिल्या दोन संघांना सुपर 8 मध्ये स्थान मिळेल. त्यानंतर यातील प्रत्येकी चार-चार संघांचे दोन ग्रुप पाडले जातील. यातून पुढे उपांत्य फेरीसाठी सर्वोत्तम चार संघ निवडले जातील. (The date of T20 World Cup is understood! ICC’s tournament to be played in ‘these’ two countries)

महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’


Previous Post

भारताच्या माजी खेळाडूला सूर्यावर फुल कॉन्फिडन्स; म्हणाला, विश्वचषकात ‘या’ क्रमांकासाठी तोच प्रबळ दावेदार

Next Post

वरूणराजा लांबवणार टीम इंडियाचा मालिका विजय? दुसऱ्या वनडेआधी असे आहे बार्बाडोसचे वातावरण

Next Post
पहिल्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय! कुलदीप-जड्डूनंतर ईशान चमकला

वरूणराजा लांबवणार टीम इंडियाचा मालिका विजय? दुसऱ्या वनडेआधी असे आहे बार्बाडोसचे वातावरण

टाॅप बातम्या

  • वर्ल्डकपसाठी समालोचकांची मांदीयाळी, दिग्गज क्रिकेटपटू पसरवणार आपल्या आवाजाची जादू; पाहा यादी
  • अभिमानास्पद! गोळाफेक खेळात पदक जिंकणारी Kiran Baliyan पहिलीच भारतीय, 72 वर्षांनंतर घडवला इतिहास
  • ‘माझी प्लेइंग 11मधून अचानक हाकालपट्टी केली…’, भारताविरुद्ध न खेळवल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान
  • कधी, कुठे आणि कसा पाहता येईल IND vs ENG संघातील सामना? एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती
  • वेलकम बॅक कॅप्टन! वर्ल्डकपआधी सराव सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय
  • श्रीलंकेवर भारी पडली बांगलादेशची फलंदाजी, कर्णधार शाकिब नसताना संघाचा मोठा विजय
  • एमएसएलटीए भारती विद्यापीठ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन (14 वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकूण 134 खेळाडू सहभागी
  • स्टुअर्ट ब्रॉडच्या सन्मानार्थ मोठा निर्णय, ज्या स्टेडियमवर क्रिकेटशी प्रेम झालं, तिथेच लावली आपल्या नावाची पाटी
  • मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म
  • भारतीय खेळपट्टीवर तळपली बाबरची बॅट! सराव सामन्यातच विरोधांना मिळाली चेतावणी
  • भारतातील त्रासाला वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कंटाळला जॉनी बेयरस्टो! सोशल मीडियावर निघाला राग
  • आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम
  • वर्ल्डकपआधी दुखापतींचे सत्र सुरूच! विलियम्सनपाठोपाठ ‘या’ संघाचाही कर्णधार जायबंदी
  • World Cup Countdown: फ्लाईंग कैफचा 20 वर्षापासून अबाधित असलेला विक्रम, श्रीलंकेविरुद्ध दाखवलेला जलवा
  • BREAKING: विश्वचषकाच्या सुरुवातीआधीच न्यूझीलंड संघाला धक्का, कॅप्टन केन दुखापतीमुळे बाहेर
  • “आपला संघ भारतापेक्षा कमजोर”, पाकिस्तानी दिग्गजाने सुनावली संघाला खरीखोटी
  • चॅम्पियन्स पुन्हा एकसाथ! 2011 विश्वचषकातील फक्त दोघेच हिरे खेळणार World Cup 2023
  • BREAKING: अखेरच्या क्षणी टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघात बदल, 115 सामने खेळलेल्या खेळाडूला केले इन
  • BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री
  • World Cup Special: हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे बदनाम झालेले ईडन गार्डन्स
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In