कोरोना व्हायरसमुळे जगभरातील परिस्थिती खूप वाईट झाली आहे. यामुळे कित्येक देशांमध्ये सर्वकाही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. आता अशी परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे सदस्य येत्या शुक्रवारी (२७ मार्च) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने चर्चा करणार आहेत.
येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी२० विश्वचषक (ICC T20 World Cup) खेळण्यात येणार आहे. तर जागतिक कसोटी चँपियनशिपअंतर्गत (World Test Championship) द्विपक्षीय मालिकाही खेळण्यात येणार आहे. जर पुढील दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊनची (Lockdown) परिस्थिती कायम राहिली तर या स्पर्धांमध्ये बदल केला जाऊ शकतो.
परंतु यासंदर्भात आयसीसीच्या सदस्यांनी शुक्रवारी होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान (Video Conference) कोणताही निर्णय घेेणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “या कॉन्फरन्सचे आयोजन अपघाती योजनांची अद्ययावत माहिती घेण्यासाठी केले आहे. जर परिस्थिती आणखी बिघडली तर आपल्याकडे प्लॅन ‘बी’ आण ‘सी’ तयार असला पाहिजे. त्यामुळे आयसीसीच्या सदस्यांनी उपलब्ध पर्याय समजून घेतले पाहिजे.”
याव्यतिरिक्त भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलवरही (IPL) संकट येऊ शकते. कारण पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (२४ मार्च) भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वीच बीसीसीआयने (BCCI) १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मंगळवारी म्हणाला होता की, कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी देशातील लॉकडाऊन पाहता यावर्षीच्या आयपीएल आयोजनावर त्याच्याकडे “कोणतेही उत्तर नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी
-टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
-वेळच अशी आलीय की २४ शतकं केलेला हा खेळाडूही करतोय टाॅयलेट साफ